मुंबई | राज्यात आगामी काळात मोठ्या प्रमाणात भरती (Recruitment) होणार आहे. अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिली. गेली अनेक वर्षे सर्वच क्षेत्रातील भरती प्रक्रिया मंदावल्या होत्या.
देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमोहत्सवी वर्षात 75,000 पदांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा देसाईंनी केली आहे. राज्यात शासनाच्या 29 प्रमुख विभागांमध्ये दोन लाख 193 जागा रिक्त आहेत.
यातील राज्य लोकसेवा आयोगात 100 टक्के पदभरती होणार आहे. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगात 50 टक्के पदभरती करण्यात येणार आहे. विधानसभेत मंत्री शंभुराज देसाई यांनी ही माहिती दिली.
सर्व विभागांनी सुधारीत आकृतीबंध जाहीर केले आहेत. त्या सुधारीत आकृती बंधानुसार नव्या भरत्या घेण्यात येणार आहेत. एमपीएससीतर्फे (Maharashtra Public Service Commission) ही पदे भरण्यात येणार आहेत.
यावेळी मराठा समाजातील (Maratha) उमेदवारांसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठा समाजातील उमेदवारांना आर्थिक दुर्बल घटकांत आरक्षित पदांवर नियुक्ती मिळणार आहे.
तसेच यावेळी पोलीस भरतीवर (Police Recruitment) देखील चर्चा करण्यात आली आणि त्याबाबत देखील महत्वपू्र्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील गृहविभागात लवकरच सात हजार पोलिसांची भरती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
यावेळी विधानसभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी सांगितले की, राज्यातील अनेक जिल्ह्यांत पोलिसबळ कमी पडत आहे. मनुष्यबळाची आवश्यक्ता लक्षात घेऊन लवकरच विविध अशा सात हजार पदांसाठी पोलीस भरती घेण्यात येणार आहे.
महत्वाच्या बातम्या –
दिल्लीत ऑपरेशन लोटस?; आम आदमी पक्षाचे अनेक आमदार संपर्काच्या बाहेर
उद्धव ठाकरेंची भाजपवर सडकून टीका, “भाजप पक्ष नाही तर…”
मुंबई एसी लोकल आंदोलन: प्रवाशांसाठी प्रशासनाचा महत्वपूर्ण निर्णय
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावरील सीबीआय तपासात नवीन माहिती समोर
“माझे मंत्रिपद गेले तरी मला काही फरक पडत नाही” – गडकरींच्या भाषणाची चर्चा जोरात