Top news

ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय; बंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ

मुंबई | बंधपत्रित डॉक्टर्सच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा तसेच कंत्राटी डॉक्टर्सचे आणि त्यांचे मानधन समान करण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय जाहीर केला. तसेच राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनीही ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.

सरकारच्या या निर्णयामुळे कोरोना लढाईला निश्चितपणे बळ मिळणार आहे. वाढीव मानधनानुसार आता आदिवासी भागातील बंधपत्रीत डॉक्टर्सना 60 हजारांच्या ऐवजी 75 हजार रुपये मानधन मिळणार आहे.

आदिवासी भागातील बंधपत्रीत विशेषज्ञ डॉक्टर्सना 70 हजार ऐवजी 85 हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. तर इतर भागातील एमबीबीएस डॉक्टर्सना 55 हजारांऐवजी 70 हजार रुपये मानधन आणि इतर भागातील विशेषज्ञ डॉक्टर्सना 65 हजारांऐवजी 80 हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.

 

 

 

 

 

महत्वाच्या बातम्या-

-सचिन सावंत हे खोटं बोलण्याची फँक्टरी आहे- आशिष शेलार

-अक्षय बोऱ्हाडेप्रकरणी आढळरावांचा मोठा निर्णय, खा. कोल्हेंना धक्का!

-सामूहिक शक्तीच्या जोरावर कोरोनाला आपण निश्चितच हरवू- अजित पवार

-संकटातही बळीराजाची दिलदारी; कोरोना लढ्यासाठी लावला मोठा हातभार

-“कोरोनाच्या संकटात समाजकार्य करा, साहेबांच्या स्मृतीदिनी गडावर गर्दी नको”