नारायण राणेंचा ‘स्वाभिमान’ भाजपमध्ये विलीन!

मुंबई |  महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते नारायण राणे यांनी आपला पक्ष भाजपामध्ये विलीन करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. 1 सप्टेंबरला ते आपला स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करणार आहेत.

नारायण राणे यांनी 10 दिवसांमध्ये आपण मोठा राजकीय निर्णय घेणार असल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर त्यांनी आज भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आहे. त्यांच्या या भेटीत त्यांनी पाटलांकडून काही गोष्टी कबूल करून घेतल्याची चर्चा आहे.

राणे यांनी काँग्रेसमधून फारकत घेऊन महाराष्ट्र स्वाभिमान नावाचा पक्ष स्थापण केला. मात्र तो पक्ष कोकणापुरताच मर्यादित राहिला. स्वाभिमान संपूर्ण महाराष्ट्रात पसरला नाही. राणे सध्या भाजपचे राज्यसभेचे सहयोगी खासदार आहेत.

दरम्यान, विधानसभेच्या तोंडावर नारायण राणेंच्या निर्णयाने कोकणात भाजपला फायदा होईल, असं बोललं जातंय. 

महत्वाच्या बातम्या-