युतीत बंडखोरीची शक्यता; परभणीत भाजपला हव्यात शिवसेनेच्या जागा

परभणी : मागील विधानसभा निवडणुकीनंतर भाजपची परिस्थिती बदलली आहे. भाजपची ताकद वाढल्याने वरिष्ठ नेतेही शिवसेनेच्या जागा मागत आहेत. युती आणि जागा वाटपावरून जो वाज वरिष्ठ पातळीवर आहे तोच वाद स्थानिक पातळीवरही असल्याचं कळतंय.

परभणी जिल्ह्यातील शिवसेनेच्या दोन्ही जागांवर भाजपने दावा केला आहे. तर एकीकडे कोणत्याही परिस्थितीत आम्हीच आमच्या जागा लढवणार आहोत, असा पवित्रा शिवसेनेने घेतला आहे. 

परभणी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा असला तरीही लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला 30 हजारांची लीड मिळाली होती. त्यामुळे ही जागा भाजपला सोडावीत, अशी मागणी भाजपचे नेते आनंद भरोसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्य चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. 

परभणीची जागा कोणत्याही परिस्थितीत सोडवून घेणार, असा पवित्रा आनंद भरोसेंनी घेतला आहे. 

परभणीतील शिवसेना आमदार राहुल पाटील आणि आनंद भरोसे यांच्यात वाद असल्याने येत्या काळात यांच्यातील टोकाचा वाद होण्याची दाट शक्यता आहे. 

स्थानिक पातळीवर भाजपचे नेते जागा सोडवून घेण्याची भाषा करत आहेत तर दुसरीकडे कोणी काहीही करो आम्हीच आमच्या जागा लढवणार, असा विश्वास शिवसेनेच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. 

महत्वाच्या बातम्या-

-“नारायण राणे या मतदारसंघातून लढणार”

-दोघी खुदकन हसल्या अन् टेबलामागे दडल्या; सोशल मीडियावर एकच चर्चा सुरु

-मोबाईल तसेच लॅपटॉपवर ‘पॉर्न’ पाहणाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी

-रात्रीच्या अंधारात मुख्यमंत्र्यांना कोण-कोण भेटतं; चंद्रकांत पाटलांचा मोठा गौप्यस्फोट

-‘बीव्हीजी’चे मालक हणमंतराव गायकवाडांना 16 कोटी रुपयांना फसवलं