“अमोल कोल्हेंचा चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही”

मुंबई | राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांची हत्या करणाऱ्या गोडसेवर (Godse) सध्या व्हाय आय किल्ड गांधी हा सिनेमा येणार आहे. त्यावरून आता राज्यभर चांगलाच वाद पेटल्याचं दिसतंय.

अशातच राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी या चित्रपटात नथुराम गोडसेची भूमिका साकारली होती. त्यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी टीका केली आहे.

अमोल कोल्हे फक्त कलाकार नाहीत. ते राष्ट्रवादीचे देखील खासदार आहेत. गोडसेंच्या विचाराला ताकद मिळणं म्हणजे देशविघातक व्यवस्थेला ताकद देण्यासारखं आहे, असं नाना पटोले म्हणाले आहेत.

अशा प्रवृत्तीच्या लोकांना समाजात हिरो बनवण्याचं काम होत असेल तर ते चुकीचं आहे. या देशाला फक्त महात्मा गांधींचा विचारच तारू शकतो, असंही ते म्हणाले आहेत.

गांधींच्या विचारांनी हा देश जागतिक महासत्ता होऊ शकतो हे सातत्यानं सिद्ध झालंय. त्यामुळे आमचा या चित्रपटाला विरोध आहे, असंही नाना पटोले म्हणाले आहेत.

आम्ही या गोष्टींचा विरोध करतो. त्याचबरोबर हा चित्रपट महाराष्ट्रात रिलीज होऊ देणार नाही, असंही नाना पटोले म्हणाले आहेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना नाना पटोले यांनी हे वक्तव्य केलं आहे.

अमोल कोल्हे यांच्या नथुरामाच्या भूमिकेवर राष्ट्रवादीचे काही नेते आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कोल्हेंच्या भूमिकेला कडाडून विरोध केला होता.

तर दुसरीकडे राष्ट्ररवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी अमोल कोल्हे यांच्या भूमिकेवर कोल्हेंची पाठराखण केली आहे. त्याचबरोबर त्यांनी भाजपवर देखील निशाणा साधला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

सेक्सनंतर डोकं दुखत असेल तर गांभिर्याने घ्या, जीवावरही बेतू शकतं

शरद पवार म्हणतात, “भाजपवाले कधीपासून गांधीवादी झाले…”

 …तर संपत्तीवर मुलींचा पहिला अधिकार, सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

  Petrol Diesel Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा आजचे ताजे दर

  धक्कादायक! कोरोना लसीचे तब्बल ‘इतके’ डोस घेतल्यामुळे आजोबांवर FIR दाखल