मुंबई | मराठवाड्याचे सुपुत्र आणि केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड (Dr. Bhagwat Karad) हे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्यासोबत अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
1 फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण जनतेसमोर सादर करतील. अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड हे त्यांच्यासोबत बजेटमधील काही भाग सादर करतील.
अर्थसंकल्प सादर करायला मिळतोय, हे माझं भाग्य आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. भागवत कराड यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
माझ्यासाठी ही मोठी भाग्याची गोष्ट आहे. देशाची आर्थिक स्थिती खूप सक्षम झाली आहे. जीएसटीचं मासिक उत्पन्न 1 लाख कोटी अपेक्षित होतं. मात्र प्रत्यक्ष 1 लाख 31 हजार कोटी मासिक उत्पन्न मिळालं आहे. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने ही सकारात्मक बाब आहे, असं भागवत कराड यांनी म्हटलं आहे.
केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी यावेळी बोलताना राज्यातील इतर मंत्र्यांवर गंभीर आरोप केले. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या बैठकीला राज्यातील अर्थ मंत्र्यांनी दांडी मारली. पत्र पाठवून आणि सूचना करूनही अर्थमंत्री बैठकीला गैरहजर राहिल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे राज्याची नेमकी आर्थिक स्थिती समोर येऊ शकली नाही, असा आरोपही डॉ. भागवत कराड यांनी केला आहे.
दरम्यान,संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) 31 जानेवारीपासून सुरु होणार आहे. याबाबतची घोषणा करण्यात आली आहे.
31 जानेवारी ते 8 एप्रिल या कालावधीत अर्थसंकल्पीय अधिवेशन पार पडेल. दोन टप्प्यात हे अधिवेशन असणार आहे. देशात फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या 5 राज्यांच्या निवडणुकीच्या (Assembly Election) पार्श्वभूमीवर केंद्र सरकार काय घोषणा करणार याकडे लक्ष लागून राहणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणी महत्वाची माहिती समोर!
“कफ सिरपमध्ये चिकन शिजवून खाल्ल्याने सर्दी-खोकला गायब होतो”
Petrol Diesel Price | पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर, वाचा आजचे ताजे दर
पुण्यातील डॉक्टरने लेकीच्या लग्नाचा खर्च वाचवत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबासाठी उभारलं घर!
अभिनेत्री प्रियांका चोप्रा झाली आई; सरोगसीद्वारे घरी बाळाचं आगमन