मुंबई | राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी 11 तारखेला राज्याचं बजेट विधानसभेत मांडलं. त्यावेळी त्यांनी अनेक मोठमोठ्या घोषणा केल्या. अजित पवारांनी मांडलेल्या या अर्थसंकल्पावर भाजपने टीका केली होती.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील अर्थसंक्लपावर नाराजी व्यक्त करत महाविकास आघाडीवर टीका केली होती. अर्थसंकल्पात राष्ट्रवादीला जास्त पैसे मिळाले तर शिवसेना आणि काँग्रेसला कमी पैसे मिळाल्याचं फडणवीसांनी म्हटलं होतं.
त्यावर आता अजित पवारांनी फडणवीसांना सडेतोड उत्तर दिलं आहे. जेव्हा आपण अर्थसंकल्प तयार करतो तेव्हा त्यावर मुख्यमंत्र्यांची सही असते आणि संपूर्ण मंत्रिमंडळ त्याला मान्यता देतं, असं पवार म्हणाले.
सरकार चालवायचं म्हटलं आणि टिकवायचं म्हटलं तर अशा प्रकारे भेदभाव करुन चालत नाही. भेदभाव केला तर सरकार चार दिवसही चालणार नाही, असं देखील अजित पवार म्हणाले.
महाविकास आघाडीतील पक्षांचे काही सदस्य अर्थसंकल्पाच्या खोलात न जाता नुसता पेपर वाचून अरे हे काय चाललंय, असं म्हणतात. सरकार आणण्यासाठी तुम्ही प्रयत्न करता आहात, असं म्हणत अजित पवारांनी भाजपला सुनावलं.
काहीतरी सांगून तुम्ही दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहात. यासाठी काड्या लावायचंही काम विरोधी पक्षाकडून सुरु असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे.
दरम्यान, फडणवीसांच्या टीकेवर अजित पवारांनी रोखठोक उत्तर दिल्याने आता राजकीय वर्तुळात एकच चर्चेला उधाण आल्याचं पहायला मिळत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
होळी-धुळवडसाठी सरकारची नवी नियमावली जारी; वाचा काय आहेत निर्बंध
“सात अजुबे इस दुनिया में, आठवा अजुबा मुख्यमंत्र्यांचं…”
Omicronच्या पाचव्या व्हेरियंटचा जगभर धुमाकूळ; चीनमध्ये लाॅकडाऊन तर भारताचं टेन्शन वाढलं
संसदेत सोनिया गांधींची भाजपवर कडाडून टीका, म्हणाल्या…
“…तर काँग्रेस भाजपला 2024 मध्ये तगडं आव्हान देऊ शकतं”