मुंबई | काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याबद्दल आक्षेपार्य वक्तव्य केलं होतं. मी मोदींना मारूही शकतो आणि शिव्याही देऊ शकतो, असं नाना म्हणाले होते. त्यावरून आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी निषेध व्यक्त केला आहे.
नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केलेलं वक्तव्य अत्यंत लांच्छनास्पद आहे. पंतप्रधान पदावर असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाबाबत अशा प्रकारे गरळ ओकण्याची महाराष्ट्राची संस्कृती मुळीच नाही, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत.
तुमचा आणि संस्कृतीचा दूरदूरपर्यंत संबंध असेल, असं मला वाटत नाही, अशी टोला देखील नाना पटोले यांनी पाटलांनी लगावला आहे.
‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ असा कारभार माजवून संपूर्ण देशभरात महाराष्ट्राची बदनामी करण्याचं काम पटोले करत असल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
देशाच्या पंतप्रधानांवर एका राज्याचा कसलंही कर्तृत्व नसलेला अतिशय सामान्य नेता अशा अश्लाघ्य भाषेत वक्तव्य करतो, तिथंच यांची आणि यांच्या पक्षाच्या संस्कारांची उंची कळते, अशी घणाघाती टीका चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.
मोदींचे कर्तृत्व आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला ठेच पोहोचवणं तुमच्या दिल्लीतील पक्षप्रमुखांनाही जमलं नाही, कारण त्यांचे कार्यच तितके महान आहेत, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी काँग्रेसवर टीका केली आहे.
नरेंद्र मोदींच्या नखाचीही सर नसणाऱ्या तुमच्यासारख्या नेत्याला तरी याची जाणीव असायला हवी, असं म्हणत त्यांनी पटोले यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.
आपले संस्कार उघडे पाडणाऱ्या पटोलेंनी मोदींची जाहीर माफी मागायलाच हवी. आम्ही कधीही मारण्याची भाषा करत नाही तर केवळ राष्ट्रासाठी मरण्याची भाषा करतो कारण आम्हाला अटलजी यांचे संस्कार लाभले आहेत, असंही पाटील म्हणाले.
दरम्यान, तू दबे पाँव, चोरी-छिपे से न आ, सामने वार कर फिर मुझे आज़मा! असा शेर देखील त्यांनी ट्विट केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
सपना चौधरीच्या नव्या गाण्याचा सोशल मीडियावर धुमाकूळ, पाहा व्हिडीओ
फक्त कोरोनाच नाही तर ‘या’ आजारांवर देखील फायदेशीर कोरोना लस
“झोपेत देखील दिलेला शब्द पाळण्याची सवय मला आई-वडिलांनी लावली”
IPL 2022 Mega Auction: ‘या’ 5 खेळाडूंवर लागू शकते सर्वाधिक बोली
किंग कोहलीचा उत्तराधिकारी कोण??? ‘या’ खेळाडूच्या नावाची होऊ शकते लवकरच घोषणा