Mahashivatri 2024 Shubh Muhurat l धार्मिक मान्यतांनुसार अनेक जन्मांच्या कठोर तपश्चर्येनंतर माता पार्वतीला पती म्हणून भगवान शिव प्राप्त झाले. फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला माता पार्वतीचा विवाह भगवान शंकराशी झाला होता. म्हणून दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला भगवान शिव आणि माता पार्वतीच्या विवाहाच्या स्मरणार्थ महाशिवरात्री हा पवित्र सण साजरा केला जातो.
यंदाच्या वर्षी महाशिवरात्रीचा सण हा उद्या म्हणजेच शुक्रवार, 8 मार्च रोजी आहे. यावेळी महाशिवरात्रीच्या दिवशी अनेक शुभ योगायोग घडत आहेत, जे या वेळी महाशिवरात्रीला विशेष बनवत आहेत. तसेच महाशिवरात्रीच्या दिवशी शिवयोग, सर्वार्थ सिद्धी योग, सिद्ध योग आणि श्रवण नक्षत्र यांचा संयोग होणार आहे.
Mahashivatri 2024 Shubh Muhurat l महाशिवरात्री 2024 शुभ मुहूर्त? :
चतुर्दशी तिथी 8 मार्च रोजी रात्री 9.57 वाजता सुरू होईल. तर चतुर्दशी तिथी 9 मार्च रोजी सायंकाळी 6.17 वाजता समाप्त होईल. पूजेचा शुभ मुहूर्त 12.07 ते 12.56 पर्यंत असेल. व्रताचा पारण मुहूर्त 9 मार्चच्या सकाळी 6.37 ते दुपारी 3.28 पर्यंत असणार आहे.
या महाशिवरात्रीला हे शुभ संयोग घडत आहेत :
ज्योतिषशास्त्रानुसार यावेळी महाशिवरात्रीला अनेक प्रकारचे शुभ संयोग घडत आहेत. असे मानले जाते की महाशिवरात्रीच्या दिवशी या दुर्मिळ योगायोगांमध्ये भगवान शंकराची पूजा केल्याने अनेक पटींनी फळ मिळते. या महाशिवरात्रीला सर्वार्थ सिद्धी योग, शिवयोग, सिद्ध योग आणि श्रवण नक्षत्र योग असे शुभ संयोग तयार होत आहेत.
Mahashivatri 2024 Shubh Muhurat l महाशिवरात्रीला शुभ योगायोग होणार :
सर्वार्थ सिद्धी योग – सकाळी 06:38 पासून सुरू होणार तर सकाळी 10:41 पर्यंत चालू राहील.
शिवयोग – 9 मार्च रोजी सूर्योदयापासून रात्री 12:46 पर्यंत राहील.
सिद्ध योग – 9 मार्चच्या रात्री 12:46 वाजता सुरू होऊन रात्री 08:32 वाजता समाप्त होईल.
श्रावण नक्षत्र- सकाळी 10.41 पर्यंत असणार आहे.
News Title : Mahashivatri 2024 Shubh Muhurat
महत्त्वाच्या बातम्या-
महिला दिनानिमित्त जाणून घ्या भारतातील 5 सर्वात श्रीमंत महिला अन् त्यांची संपत्ती
महिला दिनानिमित्त अवघ्या 100 रुपयांत पाहता येणार हा चित्रपट!
ना बॅटरी, ना पेट्रोल खर्च, कारमध्ये बसवा Mini Solar AC
आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींने प्रवासात अत्यंत सावधानता बाळगावी
मनोज जरांगे पाटलांना सर्वात मोठा धक्का!