शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी; महाशिवरात्रीला विशेष रेल्वे धावणार,पाहा वेळापत्रक

Mahashivratri Special Train l शिवभक्तांचा वर्षातील सर्वात मोठा सण शिवरात्री अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. यंदा महाशिवरात्री हा सण 8 मार्च रोजी साजरा होत आहे. यानिमित्त रेल्वेने शिवभक्तांसाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. उज्जैनमध्ये महाशिवरात्री मेळ्याच्या निमित्ताने भाविकांची सहज वाहतूक करण्यासाठी रेल्वेने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.

महाशिवरात्रीनिमित्त अतिरिक्त प्रवाशांची सोय करण्यासाठी पश्चिम रेल्वे विशेष भाड्यावर अनारक्षित दोन विशेष गाड्या चालवणार आहे. पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, या गाड्यांची माहिती पुढीलप्रमाणे आहे.

Mahashivratri Special Train l असे असेल वेळापत्रक :

रेल्वे क्रमांक 09305 उज्जैन-संत हिरडाराम नगर स्पेशल ही उज्जैन येथून दररोज 10.00 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 13.30 वाजता संत हिरडाराम नगर येथे पोहोचेल. तसेच रेल्वे क्रमांक 09306 संत हिरडाराम नगर-उज्जैन स्पेशल ही संत हिरडाराम नगर येथून दररोज 13.50 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 17.30 वाजता उज्जैनला पोहोचेल. या गाड्या 05 मार्च ते 17 मार्च 2024 पर्यंत धावणार आहेत. तसेच ही ट्रेन दोन्ही दिशांना मकसी, शुजालपूर, सीहोर आणि बकनिया भाऊंरी स्थानकावर थांबणार आहे.

Mahashivratri Special Train l ट्रेन क्र. 09307 उज्जैन-भोपाळ स्पेशल उज्जैन येथून रोज 20.00 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 23.55 वाजता भोपाळला पोहोचेल. ही ट्रेन 05 मार्च ते 17 मार्च 2024 पर्यंत धावेल.

त्याचप्रमाणे गाडी क्रमांक 09308 भोपाळ-उज्जैन स्पेशल ही भोपाळहून दररोज 0.30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी उज्जैनला 4.25 वाजता पोहोचेल. ही ट्रेन 06 मार्च ते 18 मार्च 2024 पर्यंत धावणार आहे. तसेच ही ट्रेन दोन्ही दिशांना मकसी, शुजालपूर, सीहोर आणि संत हिरडाराम नगर स्थानकावर थांबेल.

News Title : Mahashivratri Special Train Timetable

महत्त्वाच्या बातम्या-