…म्हणून राज्य सरकार 19 जिल्हे वगळून शेतकरी कर्जमाफीची यादी जाहीर करणार!

मुंबई | ठाकरे सरकारने महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेची पहिली यादी 24 फेब्रुवारीला जाहीर केली होती. त्यानंतर आज दुसरी यादी जाहीर केली जाणार आहे. मात्र, आज 19 जिल्हे वगळून शेतकरी कर्जमाफीची यादी जाहीर केली जाणार आहे.

आजची शेतकरी कर्जमाफीची दुसरी यादी 19 जिल्ह्यात लागणार नाही. ग्रामपंचायत निवडणुकांमुळे सहकार विभागाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 19 जिल्ह्यातली कर्जमाफी दोन महिने रखडणार आहे. मात्र, बाकीच्या जिल्ह्यांची यादी आज जाहीर होईल.

ठाकरे सरकारने जाहिर केलेल्या पहिल्या यादीत 68 गावातील 15 हजार 358 लाभार्थ्यांची नावं जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर पुढील यादी 28 फेब्रुवारीला जाहीर करणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं होतं.

दरम्यान, आत्तापर्यंत 35 लाख कर्जदात्या शेतकऱ्यांची माहिती सरकारकडे आली आहे. सरकारच्या नियोजनाप्रमाणे सुरुवातील प्रत्येक जिल्ह्यातील दोन गावांचा समावेश यादीमध्ये करण्यात येईल. एप्रिलच्या शेवटपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

-ओबीसी समाजाची स्वतंत्र जनगणना व्हावी म्हणणाऱ्या भुजबळांना फडणवीसांचं उत्तर

-छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्या श्रीपाद छिंदमवर ठाकरे सरकारची मोठी कारवाई

-फडणवीसांच्या काळात सिडकोत घोटाळा झाल्याचा आरोप, कॅगचा ठपका?

-घुसखोर कळवा, बक्षीस मिळवा!; मातोश्री’च्या अंगणात लागले मनसेचे पोस्टर

-‘सर्व मोदी चोर आहेत’ म्हणणाऱ्या राहुल गांधींना न्यायालयाचा दिलासा