महात्मा गांधी काँग्रेससाठी ‘ट्रेलर’ पण आमच्यासाठी ‘जीवन’-मोदी

नवी दिल्ली | राष्ट्रपिता महात्मा गांधी तुमच्यासाठी ट्रेलर असतील, पण आमच्यासाठी ते जीवन आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर चर्चेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. यावेळी त्यांनी भाजप सरकारने केलेल्या विकास कामांचा पाढा वाचला तर काँग्रेसला जोरात चिमटे काढले.

अभिभाषणानंतर पंतप्रधान मोदी बोलण्यासाठी उभे राहिले तेव्हा भाजप खासदारांनी जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. याला उत्तर म्हणून काँग्रेस सदस्यांनी महात्मा गांधी झिंदाबादच्या घोषणा दिल्या. तसेच काँग्रेस नेते अधिर रंजन चौधरी यांनी हे फक्त ट्रेलर असल्याचं म्हटलं. यावर मोदींनी क्षणाचाही विलंब न लावता राष्ट्रपिता महात्मा गांधी तुमच्यासाठी ट्रेलर असतील, पण आमच्यासाठी ते जीवन आहेत, असं म्हटलं. भाजप खासदारांनी बाकं वाजवून मोदींच्या वक्तव्याची स्तुती केली.

काँग्रेसच्या मार्गावर आम्ही आज चालत असतो, तर अनेक वर्षानंतरही ही प्रगती झाली नसती. आमच्या सरकारमध्ये हिंमत आहे. त्यामुळेच आम्ही देशासाठी अडचणीचे ठरणारे अनेक प्रश्न सोडवू शकलो. आमच्या सरकारने हिंमत दाखवून जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवलं. काँग्रेसला हे कधीच जमलं नसतं, असं पंतप्रधान मोदी म्हणाले.

मोदींनी काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. लोकांनी केवळ सरकार बदललं नाही, तर देशात बदल होण्याची अपेक्षा ठेवली. त्यामुळे आम्हाला निवडून दिलं, असं ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-“महाराष्ट्राच्या लोकांनी ज्यांना घरी बसवलं ते दिल्लीत जाऊन काय करणार?”

-सच्चा हिंदू मैदान सोडून कधीच पळत नाही; केजरीवालांची अमित शहांवर टीका

दिल्ली निवडणुकीनंतर शाहीन बाग जालियनवाला बाग होईल; ओवैसींचं खळबळजनक वक्तव्य

“थोडीशी माणुसकी असेल तर अण्णा हजारेंनी सरकार विरोधात आंदोलन करून दाखवावं”

-हर्षवर्धन पाटील राजकीय भूकंप घडवण्याच्या तयारीत!