बीड | राज्यात सध्या महाविकास आघाडीचं सरकार असून आघाडी सरकारला दोन वर्षे पूर्ण झाली आहेत. सध्या आघाडी सरकारचं तिसरं वर्ष सुरु आहे.
आघाडी सरकारची सत्ता असली तरी या आघाडी सरकारमध्ये अलबेल नसल्याच्या चर्चा रोज पहायला मिळतात. विरोधक तर आघाडी सरकार हे बिघाडी सरकार असल्याचं म्हणत आहेत.
विविध मुद्द्यांवरुन आघाडी सरकारमध्ये खटके उडत असतात. अशातच या चर्चांना सध्या काॅंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिजोरा दिल्याचं पहायला मिळालं.
बीडमध्ये कृषिप्रदर्शनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला बोलत असताना नाना पटोले यांनी महाविकास आघाडीविषयी मोठं वक्तव्य केलं आहे.
भाजपला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीसोबत सत्तेत आलो आहोत. काॅंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना महाविकास आघाडीसोबत यायचं नव्हतं. केवळ भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आम्ही यांच्यासोबत आलो, असं नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
महाविकास सरकारसोबत येण्यासाठी सोनिया गांधीनी एक अट घातली होती. आम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नको, पण पहिल्याच अधिवेशनात शेतकरी कर्जमाफी झाली पाहिजे, असं पटोले यांनी सांगितलं.
दरम्यान, महाविकास आघाडी सरकामध्ये काॅंग्रेसची नाराजी आहे या चर्चा ऐकू येत होत्या मात्र नाना पटोलेच्या मोठ्या वक्तव्यानं याव शिक्कामोर्तब झाला आहे.
काॅंग्रेसच्या नाराजीवर आता राष्ट्रवादी काॅंग्रेस आणि शिवसेना काय प्रतिक्रिया देतील हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“ठाकरे सरकारच्या दबावासमोर मी झुकणार नाही”; फडणवीसांचा आक्रमक पवित्रा
“बाहेर पडलं की पाऊस अन् टिव्ही लावला की संजय राऊत”
“राष्ट्रवादीचे सर्वच नेते भ्रष्टाचाराने माखलेले, सगळे जेलमध्ये जाणार”
“काही लोक आता जेलमध्ये सकाळच्या पत्रकार परिषदेची परवानगी मागतील”