‘ही कारवाई राजकीय आकसापोटीच’, एकनाथ शिंदे कडाडले

मुंबई | एकनाथ शिंदेंच्या बंडाळीनंतर राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं आहे. नाराज एकनाथ शिंदे व शिंदे गटातील आमदारांची समजूत काढण्याचे अनेक प्रयत्न शिवसेनकडून करण्यात आले.

अनेक प्रयत्न करूनही शिंदे गट त्यांच्या मागणीवर ठाम असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेनं राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबतच्या आघाडीतून बाहेर पडावं या मागणीवर एकनाथ शिंदे व शिंदे गटातील आमदार ठाम आहेत.

समजूत काढण्याचे प्रयत्न अपयशी ठरल्याने आता महाविकास आघाडीकडून कारवाईचा बडगा उचलला जात आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांच्या आदेशाने शिवसेना आमदारांची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे.

महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयावर एकनाथ शिंदे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. राजकीय आकसापोटी ही कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप एकनाथ शिंदेंनी केला आहे.

शिवसेना आमदार व त्यांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारचीच आहे. गेल्या अडीच वर्षात महाविकास आघाडीतील घटक पक्षाकडून शिवसेनेचे खच्चीकरण करण्यात येत आहे, असा आरोपही शिंदेंनी केला आहे.

दरम्यान, शिंदे गट विरूद्ध शिवसेना वाद आता शिगेला पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे या प्रकणाला आता काय वळण लागणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सर्वात मोठी बातमी! एकनाथ शिंदेंची पक्षाच्या नेतेपदावरुन हकालपट्टी होणार?

“तुम्ही आमचे सहा नगरसेवक नेले, शिंदेंनी तुमचे 36 आमदार नेले, आता कसं वाटतंय?”

मोठी बातमी! विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रिचेबल

“अजित पवार सुडानेच पेटलेले, पाय धरून पाया पडलो तरी…”; बंडखोर आमदाराची ऑडिओ क्लिप व्हायरल

‘जे धमकी देतील त्यांनी माझ्याकडे या’, उदयनराजे कडाडले