“तुम्ही आमचे सहा नगरसेवक नेले, शिंदेंनी तुमचे 36 आमदार नेले, आता कसं वाटतंय?”

मुंबई | शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडामुळे अडचणीत आलेल्या शिवसेनेची मनसेने खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे. मनसेचे चांदीवली विधानसभा अध्यक्ष महेंद्र भानुशाली यांनी शिवसेनेला बॅनर्सच्या माध्यमातून डिवचलं आहे.

बॅनर्सवर त्यावेळी माझ्या राजसाहेबांचे नगरसेवक फोडलेत, आता कसं वाटतंय?, असा प्रश्न विचारला आहे. मी राजनिष्ठ कार्यकर्ता आहे. मी राजभक्त आहे. म्हणून मला वाटलं की त्यावेळी जे आम्हाला सातत्याने सांगत होते की सहा नगरसेवक गेलेत तर मनसे संपली. पण तुम्ही जे पेरणार तेच उगवणार आहे, असंही ते म्हणालेत.

काही दिवसांपूर्वी एकच बातमी चालायची की आम्ही खरे हिंदूत्व ते खोटे हिंदूत्ववादी. पूर्ण भारताने राज ठाकरेंच्या रुपाने कट्टर हिंदूत्ववादी नेता पाहिला. मात्र आज कशी परिस्थिती झालीय की तुमचेच आमदार सांगतायत तुम्ही हिंदूत्व सोडल्याने आम्हाला इथं जावं लागलं आहे.
सगळ्यांना माहिती पडलं की खरा हिंदूत्ववादी नेता राज ठाकरे आहेत, असंही भानुशाली म्हणालेत.

मी एकनाथ शिंदेंना एवढं सांगणार आहे की, आमदार घ्या पण तपासून घ्या. नाहीतर असं होणार आमच्याकडून फायदा नाही झाला म्हणून ते शिवसेनेत गेले, असंही त्यांनी म्हटलंय.

मुंबई महानगरपालिकेमध्ये 2017 साली मनसेचे सात नगरसेवक असताना शिवसेनेने त्यातील सहा नगरसेवकांचा गट फोडला होता. त्याच राजकीय घडामोडीची आठवण या बॅनर्सच्या माध्यमातून भानुशाली यांनी करुन दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ नॉट रिचेबल 

मोठी बातमी! शिवसेना नेते अर्जुन खोतकरांवर ईडीची कारवाई

सर्वोच्च न्यायलयाचा मोठा निर्णय! गुजरात दंगल प्रकरणी पंतप्रधान मोदींना क्लिन चीट

‘स्वत:चा मुलगा खासदार आहे त्याचं काय’, उद्धव ठाकरेंचा शिंदेंवर हल्लाबोल

“बंडखोर आमदारांना पश्चिम बंगालमध्ये पाठवा, आम्ही योग्य तो पाहुणचार करू”