Top news खेळ देश

महेंद्रसिंग धोनीनं स्वतःच्याच नकळत आयपीएलमध्ये रचला नवीन विक्रम!

नवी दिल्ली | आयपीएलच्या १३ व्या मोसमातील ३७ वा सामना सोमवारी पार पडला. हा सामना अबु धाबीतील शेख जाएड स्टेडिअममध्ये पार पडला. चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल यांच्यात हा सामना खेळला गेला.

हा सामना खेळण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघाचे कर्णधार महेंद्र सिंह धोनी मैदानात उतरले तेव्हाच त्यांनी एक विक्रम केला. अजून हा विक्रम कोणत्याही खेळाडूने केला नाही.

आयपीएलचे सर्वात जास्त सामने खेळणारे महेंद्र सिंह धोनी हे पहिलेच खेळाडू ठरले आहे. या सामन्यानंतर महेंद्र सिंह धोनी २०० सामने खेळणारे पहिले खेळाडू ठरले आहे. पण विक्रमाबद्दल स्वतः महेंद्र सिंह धोनी यांना काहीच माहित नव्हते.

जेव्हा राजस्थान रॉयल संघाविरुद्ध २०० वा आयपीएल सामना खेळण्यासाठी मैदानात उतरले. या सामन्याचा नाणेफेक करायला गेले तेव्हा त्यांना स्वतःलाच माहित नव्हते की, ते २०० वा आयपीएल सामना खेळत आहे.

नाणेफेक करण्याच्या दरम्यान नाणेफेक प्रस्तुतकर्ते आणि माजी क्रिकेटर डॅनी मॉरिसन यांनी धोनी यांना विचारले की, तुम्ही २०० वा आयपीएल सामना खेळत आहात, त्याबद्दल तुम्ही काय सांगाल ?

याला उत्तर देताना महेंद्र सिंह धोनी आश्चर्यचकित होऊन म्हणाले, तुम्ही आता बोलले तेव्हा मला समजले की मी २०० वा सामना खेळत आहे. हे करणे खूपच चांगले आहे. पण त्याचबरोबर मी हेही सांगू इच्छितो की, ही एक फक्त संख्या आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले की, इतक्या काळापासून मला कोणतीही दुखापत न होता मी खेळत आहे, यासाठी मी स्वतःला भाग्यवान समजतो. महेंद्र सिंह धोनी हे २००८ पासून चेन्नई सुपर किंग्ज संघासोबत कर्णधार म्हणून खेळत आहे.

चेन्नई सुपर किंग्ज संघाने तीन वेळा विजेतेपद जिंकले आहे. पण दोन वर्ष ते रायजिंग पुणे सुपरजाइंट्स संघाबरोबर खेळत होते. कारण दोन वर्ष काही कारणांकरिता चेन्नई सुपर किंग्ज संघाला खेळण्यास मनाई केली होती.

सोमवारी झालेल्या सामन्यात प्रथम चेन्नई सुपर किंग्ज संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यात त्यांनी राजस्थान रॉयलसमोर १२५ धावांचे लक्ष उभारले. मात्र, राजस्थान रॉयल संघाने १७.३ षटकांमध्ये ३ बळी गमावून विजय मिळवला. या सामन्यात धोनी यांनी २८ चेंडूत २८ धावा केल्या आणि धावचित होऊन बाद झाले.

काही दिवसांपूर्वीच चेन्नई सुपर किंग्ज संघाचे कर्णधार महेंद्र सिंह धोनी हे आयपीएलमधील १०० पेक्षा जास्त झेल घेणारे दुसरे यष्टिरक्षक बनले आहेत. या यादीत पहिल्या क्रमांकावर कोलकाता नाईट रायडर्सचे कर्णधार दिनेश कार्तिक यांनी हा विक्रम केलेला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

अखेर एकनाथ खडसे यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित; राष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्यानं दिली माहिती

भाजपला मोठा धक्का! पक्षांतरापूर्वीच खडसेंनी मोदींविरुध्द टाकलं पहिलं पाऊल

सुशांत प्रकरणी डाव फिरला! आता एनसीबी विरोधातच ‘या’ प्रकरणी गु.न्हा दाखल

पंकजा मुंडेंना पाहून का रडत आहेत ‘हे’ आजोबा? वाचा सविस्तर

अखेर खडसेंचं राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचं ठरलं! सर्व समर्थकांना ‘या’ मुहूर्तावर मुंबईत येण्याच्या सूचना?