अखेर तो थांबला! महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून घेतली निवृत्ती

मुंबई |  भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. भारतीय संघाचा आत्तापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार म्हणून धोनीच्या नावावर विक्रम आहे.

आयसीसीचे तिन्ही कप धोनीने आपल्या नेतृत्वाखाली भारताला मिळवून दिले आहेत. एकदिवसीय विश्वचषक, टी-20 विश्वचषक आणि च‌ॅम्पियन ट्रॉफीवर याचा समावेश आहे. यामध्ये आशिया चषकाचाही समावेश आहे. धोनीने कसोटी क्रिकेटमध्ये याआधी 2014 साली निवृत्ती स्वीकारली होती.

महेंद्रसिंह धोनीने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओत धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व फोटो पोस्ट केले आहे. धोनीने हा व्हिडीओ पोस्ट केल्यावर पहिल्यांगा संभ्रम निर्माण झाला होता. धोनीने खरंच निवृत्ती घेतली की नाही?, मात्र काही वेळानं नक्की झालं की धोनीने निवृत्ती घेतली आहे.

बातमी अपडेट होत आहे…

दरम्यान, धोनीच्या वि