पूरग्रस्तांना गायी, म्हशी द्या; महेश लांडगेंचं दहिहंडी आणि गणेश मंडळांना आवाहन

पुणे : पश्चिम महाराष्ट्रातील भीषण पुरामुळे सांगली आणि कोल्हापूर परिसरातील लोकांचे आतोनात नुकसान झाले आहे. त्यांच्या शेतातील पीक आणि गोठ्यातले पशूधन त्यांच्या डोळ्यादेखत उध्वस्त झाले आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तूंसह इतर मदत त्यांना मिळाली आहे. माञ खरी आवश्यकता ही पशूधनाची आहे. राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळं, गोशाळा आणि दहीहंडी मंडळांनी पूरग्रस्तांना गायी, म्हशी आणि बैलजोड्या उपलब्ध करुन द्यावेत, असं आवाहन पिंपरी-चिंचवडमधील भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी केलं आहे.

महेश लांडगेंनी याची सुरुवात स्वत:पासून केली आहे. गौरी गणपती सणानिमित्त त्यांच्या ‘शिवांजली सखी मंचा’च्या वतीने भोसरी विधानसभा मंतदारसंघात 65 कार्यक्रम नियोजित केले होते.

राज्यातील पूरस्थिती पाहता महेश लांडगेंनी सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत. त्यातील जमा झालेली रक्कम पूरग्रस्तांना मदत म्हणून दिली जाणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे. 

पूरामुळे फक्त सांगली जिल्हात 10 हजार पशूधनाचे नुकसान झाले आहे. पुरामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान तीन वर्षात न भरुन येण्यासारखे आहे. शेतीला जोडव्यवसाय म्हणून शेती केली जाते. त्यामुळे पशुधनासाठी जास्तीत जास्त मदत व्हावी, असं आवाहन महेश लांडगे यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-बाळासाहेबांमुळे गिरणी कामगाराचा मुलगा मुख्यमंत्री झाला- नारायण राणे

-बीडचा दुष्काळ हटवण्यासाठी पंकजा मुंडेंची योजना; मुख्यमंत्र्यांकडे सादर

-वडिल 9 वेळा काँग्रेसचे खासदार, ‘या’ नेत्याची आमदार मुलगी करणार शिवसेनेत प्रवेश???

-देशहिताच्या आड धर्म येता कामा नये!;’एक देश, एक संविधान’ भूमिकेचं ठाकरेंनी केलं स्वागत

-इम्रान खान यांचा मदतीसाठी ट्रम्प यांना फोन; ते म्हणाले…तुमचं तुम्ही बघा!