बिग बॉस मराठी 4 होस्ट करण्याबाबत महेश मांजरेकरांचा खुलासा!

मुंबई | कलर्स मराठी (Colors Marathi) वाहिनीवरील लोकप्रिय कार्यक्रम मराठी बिग बॉस (Big Boss Mararthi) लवकरच दर्शकांच्या भेटीला येणार आहे. यंदाचे हे चौथे पर्व (Season 4) आहे. गेली तीन पर्व अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले होते.

यंदा देखील तेच सूत्रसंचालन करणार का? असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात होता. परंतु चौथे पर्वाचे अभिनेते सिद्धार्थ जाधव (Siddharth Jadhav) सूत्रसंचालन करणार आहेत. बिग बॉसच्या निर्मात्यांनी गेल्या तीन पर्वाचा मांजरेकरांसोबत करार केला होता.

तिसऱ्या पर्वाच्या शेवटी हा करार संपुष्टात आला. त्यामुळे आता नवीन चेहऱ्याची उत्सुकता होती. त्यामुळे अभिनेते सिद्धार्थ जाधव या पर्वाचे सूत्रसंचालक असतील. नुकतेच मांजरेकरांनी त्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

माझा तीन वर्षांचा करार संपला असून मी गेली तीन वर्षे नित्यनियमाने तो कार्यक्रम केला. जर माझ्यासोबत पुुन्हा करार झाला तर तो मला करायला आवडेल, असे मांजरेकर म्हणाले.

माझ्या नावाचा विचार व्हावा, यासाठी वाहिनी बांधिल नाही, पण मला त्यांनी संधी दिली, तर मी त्याच जोमाने आणि आनंदाने त्याचे संचालन करेन. आणि जरी मला त्यांनी नाही म्हंटले तरी मी तेवढ्याच उत्साहाने तो कार्यक्रम पाहिन. आणि नवीन सूत्रसंचालकाचे कौतुकही करेन, असेही मांजरेकर म्हणाले.

गेले काही दिवस या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यासाठी सिद्धार्थ जाधव याचं नाव चर्चेत होतं. परंतु जाधव यांनी अद्याप यावर कोणतंही स्पष्टीकरण दिलेलं नाही. त्यामुळे सर्वांना आता नवीन सूत्रसंचालकाची वाट पहावी लागेल.

महत्वाच्या बातम्या – 

“अमित शहांमध्ये मला सरदार वल्लभभाई पटेलांचं प्रतिबिंब दिसतं”

नरेंद्र मोदींमुळे भारतीयांचा देशात गौरव झाला- भगतसिंह कोश्यारी

कोणत्याही निवडणूका लागल्या की मली बोलवा – अमित ठाकरे

ICICI आणि PNB बँकेच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

मोठी बातमी! शरद पवारांपाठोपाठ अजित पवारांनाही धक्का