आता महिंद्रा कंपनीनं कोरोनाच्या लढाईमध्ये दिल ‘या’ महत्वाच्या गोष्टीचं योगदान

मुंबई | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भवामुळे देशात कोरोनाग्रस्तांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे. गेल्या आठवड्यापासून देशात अधिक संख्येने कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सॅनिटायझरची मागणी अधिक आणि पुरवठा कमी असल्याचंही दिसून येत आहे. या समस्येचा सामना करण्यासाठी आता भारतातील दिग्गज कंपनी महिद्रा पुढे सरसावली आहे.

महिंद्रा कंपनीच्या एका टीमनं सॅनिटायझरच्या चाचण्या पूर्ण केल्यानंतर यासंबंधी उत्पादनाचा एक परवाना मिळवला आहे. यानंतर कंपनीच्या ब्रँडेड सॅनिटायझरचं उत्पादन सुरू करण्यात आलं आहे.

याव्यतिरिक्त कंपनी फेस शिल्डचंही उत्पादन करत आहे. याचा वापर वैद्यकीय कर्मचारी आणि करोनाचं संक्रमण झालेल्या व्यक्तीशी थेट संपर्कात येणाऱ्या व्यक्तीकडून करण्यात येतो.

दरम्यान, गेल्या महिन्यात महिंद्रा यांनी कमी किंमतीत व्हेंटिलेटर्सची निर्मिती करणार असल्याचं म्हटलं होतं. त्याची सरासरी किंमत 7 हजार 500 रूपये असल्याचंही सांगण्यात आलं होतं.

महत्वाच्या बातम्या –

-राज्यात कोरोनाचा क्रम चढताच रुग्णांचा आकडा 2 हचाराच्या वरती; एका दिवसात 82 रुग्णांची वाढ

-औरंगाबादेतील 7 वर्षीय चिमुरडीची कोरोनावर मात; कोरोनाचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह

-जयंत पाटलांवरील टीकेला विश्वजीत कदमांचं; चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर

-“विरोधी पक्षाने पेटवलेल्या वेगळ्या चुलीवर `वाधवान’प्रकरणाचं कारस्थान शिजलं नाही”

-मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद; मुख्यमंत्री सहायता निधीत जमा झाले इतके कोटी रुपये