Top news खेळ

टीम इंडियाच्या ‘या’ 6 खेळाडूंना महिंद्रा कंपनी ‘थार एसयुव्ही’ गिफ्ट देणार

नवी दिल्ली | नुकतंच भारत आणि ऑस्ट्रेलिया संघादरम्यान ब्रिस्बेन येथे कसोटी सा.मना पार पाडला. 2-1 च्या लीडने भारतीय संघाने ही बॉर्डर – गावसकर मालिकेची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. भारतीय खेळाडूंनी खूप मेह.नतीने मिळवलेल्या या विजयानंतर देशभरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

भारतीय संघाला या सामन्यात मिळालेला विजय पाहून अनेकांना आनंदा.श्रू अ.नावर झाले होते. अशातच आता महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनी भारतीय खेळाडूंसाठी मोठी घोषणा केली आहे.

भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सामन्यात केलेल्या दमदार कामगिरीमुळे महिंद्रा कंपनी भारतीय संघातील सहा युवा खेळाडूंना लोकप्रिय थार एसयुव्ही गिफ्ट देणार आहे.  महिंद्रा कंपनीचे मालक आनंद महिंद्रा यांनी ट्वीट करत याबद्दल माहिती दिली आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी सामन्यात केलेल्या उत्तम कागीरीमुळे  शुबमन गिल, शार्दुल ठाकूर, नवदीप सैनी, थंगारासू नटराजन, मोहम्मद सिराज, आणि वॉशिंग्टन सुंदर या 6 युवा खेळाडूंना महिंद्रा कंपनीची ‘थार एसयुव्ही’ भेट देण्यात येणार असल्याचं कंपनीने सांगितलं आहे. आनंद महिंद्रा यांनी केलेल्या या घोषणेमुळे भारतीय खेळाडूंचे मनोबल आणखी वाढले आहे.

दरम्यान, भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियनांनी मोठमोठ्या बाता केल्या होत्या. यामध्ये ऑस्ट्रेलियाच्या आजी खेळाडूंसह अनेक दिग्गज माजी खेळाडूंचाही सहभाग होता. भारताला कमी लेखण्याची चूक त्यांना चांगलीच महागात पडली आहे. ऑस्ट्रेलियाचे कोच जस्टीन लँगर यांनी स्वतः हे कबूल केलं आहे.

अॅडलेडमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला मानहा.नीकारक पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यातच कर्णधार विराट कोहलीने बायकोच्या डिलिव्हरीसाठी सुट्टी घेतली आणि भारतीय संघाचं नेतृत्त्व संयमी स्वभावाच्या अजिंक्य रहाणेच्या हातात देण्यात आलं.

पहिल्या कसोटी सामन्यात झालेल्या दारुण पराभवामुळे भारतीय संघ त्यातून उभारी घेणं अशक्य मानलं जात होतं. मात्र अजिंक्यच्या नेतृत्त्वात भारतीय खेळाडूंचा खेळ चांगलाच बहरला आणि भारतीय संघाने पहिल्या पराभवानंतर देखील जोरदार कमबॅक करत मालिकाच खिशात घातली.

महत्त्वाच्या बातम्या-

सोने-चांदी खरेदी करण्याची हीच आहे वेळ! सलग दुसऱ्या दिवशी सोन्या-चांदीचे भाव उतरले

अमेरिकनं भारतीयांसाठी दिली गुडन्यूज; या नियमात मोठा बदल

श्रीलंका क्रिकेटमध्ये से.क्स स्कॅं.डल? वैद्यकीय कर्मचारी महिलेबर खेळाडूने लैं.गिक गै.रवर्तन केल्याच्या आ.रोप

‘तुझी साथ नसल्याने आता गोष्टी पूर्वीसारख्या नसतील’; भारतीय संघाच्या हुकमी एक्काचं भावनिक ट्वीट

काय सांगता! आता गॅ.स सि.लेंडर मोफत मिळणार; वाचा पेटीएमची भन्नाट ऑफर