महिंद्राने लाँच केली बहुचर्चित SUV थार; जाणून घ्या वैशिष्ट्ये आणि किंमत

नवी दिल्ली | महिंद्रा ऑटोमोटिव्ह कंपनी आपल्या हटके गाड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. 15 ऑगस्ट 2020ला महेंद्रा कंपनीनं आपल्या ‘थार’ या नवीन जनरेशनवरून पडदा हटवला होता. महेंद्रा कंपनीनं आता आपली थारची न्यू ब्रँड ऑफ-रोडर बाजारात आणली आहे. महिंद्रा कंपनीची यावर्षीची ही सर्वात मोठी लाँचिंग आहे.

महिंद्रा SUV थार दिसायलाही अगदी आकर्षक आहे. महिंद्रा थार एएक्स एसी ट्रीमची किंमत 9.80 लाख रुपयांपासून सुरुवात होते. तर महिंद्रा थार एलएक्स एसी ट्रीमची किंमत 13.75 लाख रुपयांपर्यंत आहे. थार पूर्वीच्या बॉक्सरी डिझाइनवर बनवली गेली आहे. मात्र, नवीन थार 2020 मागील मॉडेलपेक्षा आकारात मोठी आहे. या थारला हार्ड टॉप आणो सॉफ्ट टॉप असे दोन्ही पर्याय दिले गेले आहेत. तसेच या थारची फिनिशिंगही उत्तम आहे.

2020 महिंद्रा थारच्या एसयूव्हीला अनेक इंजिन पर्याय आणि उपकरणे दिली गेली आहेत. एलएक्स व्हेरिएंटसह 18 इंच अलॉय व्हील्स, स्वयंचलित गिअरबॉक्स तसेच इतरही काही महत्वाच्या गोष्टी या थारमध्ये देण्यात आल्या आहेत. महिंद्रा थारचं इंजिनसुद्धा अतिशय उत्तम बनविण्यात आलं आहे.

नव्यानं आलेल्या थारला 2.0 अॅमस्टेलीयन 15 टिजीडीआय पेट्रोल इंजिन आहे. जे 5000 आरपीएमवर 150 बीएचपी पॉवर आणि 1500-3000 आरपीएमवर 320 एनएम टॉर्क जनरेट करतो. मात्र, फक्त एलएक्स ट्रीमच्या दोन्ही इंजिनला 6 स्पीड ऑटोमैटिक गिअरबॉक्सचा ऑप्शन दिला गेला आहे.

महिंद्रा ऑटोमोटिव्हने थार ऑफ रोडिंग बरोबर फोर-व्हील लो, फोर-व्हील हाय आणि टू-व्हील ड्राइव्ह मोडसह मेकॅनिकल 4 बाय 4 ट्रान्सफर केसची सुविधा दिली आहे. नवीन थारच्या पुढील भागात स्वतंत्र सस्पेंशन दिलं आहे. तर मागील भागात मल्टी लिंक युनिट दिलं गेलं आहे.

थारच्या पाठीमागील एक्सएल्स बरोबर यांत्रिक लॉकिंग डिफरंशनल इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी देखील दिली गेली आहे. याच्या मदतीनं गरज असेल तेव्हा ट्रॅक्शन योग्य चाकांपर्यंत पोहोचवलं जातं. नवीन थार 650 मी.मी. खोल पाण्यात देखील चालवण्यात येणार आहे. तसेच या थारला 226 मी.मी. इतका ग्राउंड क्लीअरन्स आहे.

नवीन थारसह प्रथमच 7 इंचचा टच स्क्रीन इन्फोटमेंट सिस्टम स्मार्ट फोन कनेक्टिव्हिटी बरोबर देण्यात आला आहे. या थारमध्ये ऑफ रोडिंग दरम्यान तांत्रिक माहिती, दिशादर्शक बाण आणि पाण्यात चालत असताना पाण्यातील गाळाची माहिती देखील ड्रायव्हरपर्यंत या स्क्रीनद्वारे पोहचवली जाते. ही स्क्रीन कस्टमाईज देखील केली जाऊ शकते. ज्यामध्ये ऑन रोड आणि ऑफ रॉड साठी भिन्न पर्याय आहेत.

तसेच या थारची आणखीही काही वैशिष्ट्ये आहेत. या थारमध्ये मॅन्युअल एचव्हिएसी, पॉवर विंडोज, दोन यूएसबी पोर्टस, 12 व्हॉटची पॉवर सॉकेट, रिमोट लॉकिंग, सेंट्रल लॉकिंग, स्पीड अलर्ट सिस्टम, मागील पार्किंग सेन्सर्स, ड्यूअल फ्रंट एअरबॅग्ज इत्यादी वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

महिंद्रा ऑटोमोटिव्हने या थारची बुकिंग सुरू केली आहे. देशातील 18 शहरांमध्ये थारची टेस्ट ड्राइव्ह सुद्धा सुरू करण्यात आली आहे. 1 नोव्हेंबरपासून नवीन महिंद्रा थार ग्राहकांपर्यंत पोहचवली जाणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांत-दिशा प्रकरणी अमित शहांचं नितेश राणेंना पत्र; पत्रात म्हणाले…

“सुशांत सिंह राजपूतची ह.त्या करण्यात आली होती की सुशांतनं आ.त्मह.त्या केली होती?”

सुशांत प्रकरणी कलम 302 लागणार? ‘या’ कारणानं सिद्धार्थ पिठानी सीबीआयच्या रडारवर

…अन् तीन दिवस रतन टाटा ताज हॉटेलच्या बाहेर पादचारी मार्गावरच थांबले होते

अभिनेता सोनू सूद आंतरराष्ट्रीय स्तरावरील ‘या’ प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित!