महिंद्रा कंपनी लवकरंच बंद करणार नुकतीच लॉंच केलेली ‘6 सीटर SUV थार’? वाचा सविस्तर

नवी दिल्ली | महिंद्रा ऑटोमोटिव्ह कंपनी आपल्या हटके गाड्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. 15 ऑगस्ट 2020ला महेंद्रा कंपनीनं आपल्या ‘SUV थार’ या नवीन जनरेशनवरून पडदा हटवला होता.

महेंद्रा कंपनीनं आता आपली थारची न्यू ब्रँड ऑफ-रोडर बाजारात आणली आहे. महिंद्रा कंपनीची यावर्षीची ही सर्वात मोठी लाँचिंग आहे. कंपनीने थारच्या बुकिंग सोबतच डिलिव्हरी देखील सुरू केली आहे. नवीन थारला बाजारात भरपूर मोठ्या प्रमाणात मागणी असल्या कारणाने या कारसाठी वेटिंग पिरीयड पण खूप जास्त आहे.

मात्र, कंपनी नवीन थार लवकरच बंद करू शकते, अशी माहिती आता समोर आली आहे. महिंद्राने या कारच्या AX ट्रीमसाठी  बुकिंग घेणे बंद केलं आहे. या ट्रीम अंतर्गतच 6 सीटर वेरीयेंट उपलब्ध होता.

महिंद्रा 6 सीटरमध्ये साईड फेसिंग सीटची सुविधा उपलब्ध आहे. तसेच या सीट्सला लॅप सीट बेल्ट उपलब्ध आहे. तर समोरच्या सीट्सवर थ्री पॉइंट सीट बेल्ट आहे. यामुळे कारच्या सेफ्टी रेटिंगवर फरक पडू शकतो. या करणाने महिंद्रा कंपनी 6 सीटर व्हर्जन बंद करू शकते.

दरम्यान, महिंद्रा SUV थार दिसायलाही अगदी आकर्षक आहे. महिंद्रा थार एएक्स एसी ट्रीमची किंमत 9.80 लाख रुपयांपासून सुरुवात होते. तर महिंद्रा थार एलएक्स एसी ट्रीमची किंमत 13.75 लाख रुपयांपर्यंत आहे. थार पूर्वीच्या बॉक्सरी डिझाइनवर बनवली गेली आहे. मात्र, नवीन थार 2020 मागील मॉडेलपेक्षा आकारात मोठी आहे. या थारला हार्ड टॉप आणो सॉफ्ट टॉप असे दोन्ही पर्याय दिले गेले आहेत. तसेच या थारची फिनिशिंगही उत्तम आहे.

2020 महिंद्रा थारच्या एसयूव्हीला अनेक इंजिन पर्याय आणि उपकरणे दिली गेली आहेत. एलएक्स व्हेरिएंटसह 18 इंच अलॉय व्हील्स, स्वयंचलित गिअरबॉक्स तसेच इतरही काही महत्वाच्या गोष्टी या थारमध्ये देण्यात आल्या आहेत. महिंद्रा थारचं इंजिनसुद्धा अतिशय उत्तम बनविण्यात आलं आहे.

महिंद्रा ऑटोमोटिव्हने थार ऑफ रोडिंग बरोबर फोर-व्हील लो, फोर-व्हील हाय आणि टू-व्हील ड्राइव्ह मोडसह मेकॅनिकल 4 बाय 4 ट्रान्सफर केसची सुविधा दिली आहे. नवीन थारच्या पुढील भागात स्वतंत्र सस्पेंशन दिलं आहे. तर मागील भागात मल्टी लिंक युनिट दिलं गेलं आहे.

तसेच या थारची आणखीही काही वैशिष्ट्ये आहेत. या थारमध्ये मॅन्युअल एचव्हिएसी, पॉवर विंडोज, दोन यूएसबी पोर्टस, 12 व्हॉटची पॉवर सॉकेट, रिमोट लॉकिंग, सेंट्रल लॉकिंग, स्पीड अलर्ट सिस्टम, मागील पार्किंग सेन्सर्स, ड्यूअल फ्रंट एअरबॅग्ज इत्यादी वैशिष्ट्यांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

कंगनाच्या भावाचा लग्नादरम्यानचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पहा व्हिडिओ

दुःखद बातमी! भाजपच्या ‘या’ महिला आमदाराचं नि.धन, राजकीय क्षेत्रात हळहळ

अंकिता अशा प्रकारे सुशांतला ट्रिब्युट देणार; पहा व्हिडिओ

धक्कादायक! ‘त्या’ आत्मह.त्या प्रकरणावरून फडणवीस सरकारवर गंभीर आरोप करत गृहमंत्री म्हणाले…a

मोठी बातमी! उर्मिला मातोंडकर शिवसेनेत प्रवेश करत दुसरी इनिंग खेळणार?