कठोर नियम करा, पण महाराष्ट्रातील मंदिरं उघडा; ब्राह्मण महासंघाची मागणी

पुणे | महाराष्ट्रातील मंदिरं अद्याप कुलूप बंद आहेत. मंदिरे हे सुद्धा लाखो लोकांच्या उपजीविकेचे साधन आहे. त्यामुळे कठोर नियम करा पण राज्यातील मंदिरे उघडा, अशी मागणी ब्राह्मण महासंघानं केली आहे.

महाराष्ट्रातीली मंदिर अद्याप बंद आहेत. त्यामुळे नियम कठोर करून राज्यातील मंदिरे उघडावेत, अशी मागणी ब्राह्मण महासंघांचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे यांनी केली आहे.

मानवी आयुष्याचे महत्व आणि किंमत आम्ही पण जाणतो. माञ धोका पत्करून सध्या 80 ते 90 टक्के व्यवहार चालू झाला आहे. मग फक्त मंदिरे बंद ठेवून काय फरक पडणार आहे, असा सवालही ब्राह्मण महासंघाने केला आहे.

संकट काळात देव दर्शनामुळे मिळणारी मानसिक शांती महत्त्वाची असते. त्यामुळे यासंदर्भात लवकरच गृहमंत्री आणि पुणे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देऊ, असं आनंद दवे यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-लक्षणं न दिसणाऱ्या लोकांपासून वाढतोय कोरोनाचा धोका; असा करा स्वतःचा बचाव

-“चक्रीवादळग्रस्तांना काहीच मदत मिळाली नाही, अत्यंत वाईट अवस्थेत लोकांना ठेवलंय”

-भारतात या 8 औषधांच्या वापराने बरे झालेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण!

-शरद पवारांचा ‘तो’ दावा विनोद तावडेंनी खोडून काढला, म्हणाले…

-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारकीच्या ऑफरवर राजू शेट्टी म्हणाले…