माजिद मेमन यांचा फडणवीसांवर गंभीर आरोप, म्हणाले “नवाब मलिक यांना…”

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना कोणतीही पूर्वसूचना देण्यापूर्वीच आज सकाळपासून ईडीने चौकशी सुरु केली होती. त्यानंतर आठ तास चौकशी करून नवाब मलिक यांना अटक करण्यात आली आहे.

नवाब मलिक यांच्यावर केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते माजिद मेमन यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक ईडी कार्यालयात गेल्याचं आम्हाला कळलं. सकाळपासून भाजपाचे नेते याबाबत बोलत आहेत, असं माजिद मेमन म्हणाले.

ईडीचे अधिकारी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता काम करतात, असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी म्हंटल्याचंही माजिद मेमन यांनी सांगितलं आहे.

केंद्रीय अर्थमंत्र्यांना आजच हे वक्तव्य का करावंस वाटलं? असा प्रश्नही माजिद मेमन यांनी उपस्थित केला आहे. परिणामी राज्याचं राजकारण पेटलं आहे.

11 नोव्हेंबर 2021 ला देवेंद्र फडणवीस यांनी एका पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांच्यावर जमीन व्यवहारासंबंधीत आरोप केले होते. परिणामी आजच्या कारवाईचा संबंध त्या वक्तव्यांशी जोडला जात आहे.

गेल्या काही काळापासून एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांच्या गैरव्यवहारांबाबत नवाब मलिक पत्रकार परिषदेच्या माध्यमातून टीका केली होती. या टीकेमुळं वानखेडे यांची दुसऱ्या विभागात नियुक्ती केली होती.

चार महिन्यांपूर्वी पत्रकार परिषदेत नवाब मलिक यांनी फडणवीसांचे आरोप फेटाळून लावले. फडणवीस यांच्या आरोपांच्या चार महिन्यानंतर नवाब मलिक यांच्यावर कारवाई होत आहे, असा आरोपही माजिद मेमन यांनी केला आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांच्यावर केलेल्या कारवाईनंतर आता केंद्र आणि राज्य सरकार यांच्यातील तणाव वाढला आहे. येणाऱ्या काळात हा सत्तासंघर्ष नव्या उंचीवर जाऊ शकतो.

महत्त्वाच्या बातम्या – 

“आता ईडीसमोर बोल नाहीतर तुझ्या हातात विडी देतील”

सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री! सिलेंडर, सीएनजीसह वीज देखील महागण्याची शक्यता

मोठी बातमी! अटकेच्या कारवाईनंतर नवाब मलिकांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

BIG BREAKING: 8 तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीकडून अटक

“कमळाबाई लाविते काडी, पण लक्षात ठेवा… पुरून उरेल सर्वांना राष्ट्रवादीचा रांगडा गडी”