Top news मनोरंजन महाराष्ट्र मुंबई

सुशांत मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड; दिशाच्या शेजाऱ्यांनी केला धक्कादायक खुलासा

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील गुंता दिवसेंदिवस वाढतंच चालला आहे. सर्वोच्च न्यायालयानं सुशांत प्रकरण सीबीआयच्या हाती सोपविलं असून याप्रकरणी रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. सुशांतचे स्नेही, कुटुंबीय, मित्र, प्रत्यक्षदर्शी असे बरेच लोक याप्रकरणी अनेक खुलासे करत आहेत. सुशांतच्या मृ.त्यूच्या सहा दिवस अगोदर सुशांतची मॅनेजर दिशा सॅलियनचाही मृ.त्यू झाला होता.

दिशा सॅलीयननं आपल्या राहत्या घरातून उडी घेवून आ.त्मह.त्या केल्याचं बोललं जात आहे. मात्र, दिशाच्या मृत्यूबाबत सत्य अजून कोणालाही समजू शकलं नाही. दिशा सॅलियनच्या मृ.त्यूचा संबंध सुशांतच्या मृ.त्यूशी असण्याची शक्यता आहे, त्यामुळे सीबीआय सुशांत प्रकरणाचा दिशाच्या अँगलनं लवकरच तपास करू शकते.

दिशा तिचा प्रियकर रोहन रॉय बरोबर राहत होती. मात्र, रोहननं अजूनही दिशाच्या मृ.त्यूच्या दिवशीची कोणतीही माहिती दिली नाही. अशातच आता दिशाच्या शेजारी राहणाऱ्या महिलेनं दिशाच्या मृ.त्यूबाबत महत्वाची माहिती दिली आहे.

दिशाचा पडलेला आवाज ऐकून संपूर्ण बिल्डींग खाली आली होती. दिशाची बॉडी बिल्डींगच्या बाहेर पडली होती. बिल्डींग नवी असल्यामुळं दिशाच्या फ्लॅटच्या बालकनीला ग्रील बसवलेलं नव्हतं. दिशाच्या मृ.त्यूनंतर हे ग्रील बसवलं आहे, असं दिशाच्या शेजारी राहणाऱ्या महिलेनं म्हटलं आहे.

तसेच दिशा केव्हा यायची केव्हा जायची याविषयी कोणालाही काही माहित नव्हतं. जेव्हा दिशाचा मृ.त्यू झाला तेव्हा समजलं की दिशा म्हणून कोणी व्यक्ती इथे राहत होती. दिशाची बॉडी ज्याच्या कार जवळ पडली त्या मुलाला माध्यमांवर उगीचच बदनाम केलं जात आहे. तो मुलगा एकदम साधा होता. मात्र, माध्यमांवर तो मुलगा कार घेवून फरार झाला असं दाखवलं जात आहे, अशी माहिती या महिलेनं दिली आहे.

दरम्यान, दिशाच्या मृ.त्युच्या वेळी जे लोक घटनास्थळी उपस्थित होते ते सर्व लोक खूप घाबरलेले आहेत. तसेच ज्या दोन गार्डसनं दिशाला खाली कोसळताना पाहिलं होतं ते लोकही खूप घाबरले आहेत, अशी माहिती शेजारी राहणाऱ्या अन्य एका महिलेनं दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

करण जोहरच्या ‘त्या’ व्हिडीओनं केला धक्कादायक खुलासा! अनेक दिग्गज एनसीबीच्या रडारवर

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कंगनाचं खुलं आवाहन, आदित्य ठाकरेंवरही केले गंभीर आरोप म्हणाली…

“शरद पवार गेल्या 50 वर्षांपासून राजकारणात; मग मराठा आरक्षण का दिलं नाही?”

बिहार निवडणुकीत कंगना भाजपची स्टार प्रचारक होणार? फडणवीसांनी दिल उत्तर म्हणाले…

‘माझे हजारो स्त्रियांशी शारिरीक संबंध असतील पण…’; सलमाननं त्यावेळी केले होते अनेक खुलासे, वाचा सविस्तर