मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुडीपाडव्याच्या सभेत हिंदूत्वाची भूमिका मांडली आणि राज्याच्या राजकारणात आता मनसे आणि भाजप युतींच्या चर्चांना उधाण आलं आहे. राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीला मोठा झटका बसला आहे.
अशातच आता महाविकास आघाडीला आणखी मोठा झटका मिळाल्याचं पहायला मिळत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार यांनी महाविकास आघाडीला जोर का झटका दिला आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडल्याची मोठी घोषणा केली आहे. खुद्द राजू शेट्टी यांनी कोल्हापूरमध्ये संघटनेच्या राज्यकार्यकारणी बैठकीत ही घोषणा केली.
महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी हे सरकार आलं होतं. साताऱ्यातल्या सभेत पवार साहेबांनी भिजत भिजत सांगितलं होतं. पवारसाहेब भिजले पण त्यात राज्यभरातील शेतकरी विरघळून गेला, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे.
दरम्यान, मागील काही दिवसांपासून राजू शेट्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडतील अशी शक्यता वर्तविली जात होती. अनेकदा त्यांनी नाराजी देखील बोलून दाखविली होती. त्यानंतर आता राजू शेट्टी यांनी मोठा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
कहरच! PUBG खेळण्यासाठी चिमुकल्यानं पोलिसांना पळवलं; किस्सा वाचून तुम्हीही पोट धरून हसाल
OnePlus चाहत्यांसाठी खुशखबर; पहिल्याच दिवशी मिळवा ‘इतक्या’ हजारांचा बंपर डिस्काऊंट
Sanjay Raut: “आम्ही तुम्हाला फाट्यावर मारतो”; संजय राऊत कडाडले
ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
“पैसे जपून खर्च करा, चिकन खरेदी करायला गेलात तरी भाजप ईडीला कळवेल”