Top news महाराष्ट्र मुंबई

उत्तर प्रदेशच्या राजकारणात मोठी उलथापालथ, भाजपला सलग सातवा झटका

Narendra Modi Yogi Aadityanath e1596614946730

मुंबई | उत्तर प्रदेश विधानसभेच्या (Uttar Pradesh Election) निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर भाजपला (BJP) एकापाठोपाठ एक धक्के बसत आहेत. निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय घडामोडी होताना दिसत आहेत.

पुन्हा एकदा भाजपला मोठा झटका बसला आहे. उत्तर प्रदेशमधील आमदार डॉ. मुकेश वर्मा (Mukesh Verma) यांनी भाजपला राम राम ठोकला आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी वर्मा यांचा राजीनामा आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट करत ही माहिती दिली आहे. वर्मा उत्तरप्रदेशमध्ये मासवर्गीयांचे नेते म्हणून ओळखले जातात.

वर्मा यांच्या राजीनाम्यानंतर भाजपला सोडचिठ्ठी देणाऱ्या आमदारांची संख्या 7 वर पोहोचली असून भाजपसाठी ही मोठी हानी असल्याचं म्हटलं जात आहे.

मागील पाच वर्षात दलित, मागास वर्गातील नेत्यांना भाजपमध्ये योग्य स्थान दिलं गेलं नाही. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रातील उद्य़ोजक आणि व्यापाऱ्यांचीही घोर उपेक्षा झाली. कुटनीतीचे धोरण अवलंबल्यामुळे राजीनामा देत असल्याचे वर्मा यांनी सांगितलं आहे.

स्वामी प्रसाद मौर्य आमचे नेते आहेत. मी त्यांच्या सोबत आहे, असं देखील वर्मा यांनी आपल्या राजीनामापत्रात सांगितलं आहे.

मंगळवारी योगी सरकारमधील कॅबिनेट मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी राजीनामा देत भाजपला पहिला मोठा धक्का दिला होता. त्यांच्यासोबतच अन्य तीन आमदारांनीही राजीनामे दिले होते.

या सर्वांनी सपात प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली असताना आज दारा सिंह चौहान यांनीही भाजपला दुसरा धक्का दिला.

योगींवर उघडपणे नाराजी व्यक्त करत मंत्री आणि आमदार भाजपला रामराम ठोकत असल्याने भाजपमध्ये अस्वस्थता पसरली आहे.

महत्वाच्या बातम्या-

भारतातील कोरोना स्थितीबाबत अमेरिकेतील तज्ज्ञांचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

‘… तर घरीच उपचार घ्या’; जाणून घ्या सरकारच्या या मार्गदर्शक सूचना 

“पंतप्रधानांबद्दल बोलताना आपली उंची किती बोलतो किती, हा विचारही राऊतांनी करावा” 

राज्यातील ‘या’ भागात पावसाची शक्यता, हवामान विभागाकडून अलर्ट जारी 

मनसेला मोठा झटका; आता ‘हा’ नेता करणार राष्ट्रवादीत प्रवेश