Top news मनोरंजन

‘ड्र.ग्जचाच प्रकार असणारं सीबीडी ऑईल भारतात कायदेशीर करा!’; वाचा कोणी केली ही मागणी

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत आहे. सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या मोबाईलमध्ये अं.मली पदार्थांचा उल्लेख आढळल्यानं एनसीबीनं याप्रकरणी तपास सुरु करत रियाला ता.ब्यात घेतलं आहे. रियानंतर अनेक दिग्गज एनसीबीच्या रडारवर आले आहेत.

चित्रपट सृष्टीतील या ड्र.ग्ज प्रकरणानं अक्षरशः वातावरण ढवळून निघालं आहे. अं.मली पदार्थ प्रकरणामुळे सोशल मीडियावरून बॉलीवूड इंडस्ट्रीवर मोठ्या प्रमाणात टी.का होऊ लागल्या आहेत. अशातच आता दिवंगत अभिनेता इरफान खानची पत्नी सुतापा सिकदर हिने ड्र.ग्ज प्रकरणी मोठी मागणी केली आहे.

सीबीडी ऑईल भारतात काय.देशीर केलं जावं, अशी मागणी सुतापानं केली आहे. सुतापानं या संबंधित इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सुतापानं एका हॉस्पिटलचा फोटो शेअर करत सीबीडी ऑईल कायदेशीर करायची मागणी केली आहे.

इन्स्टाग्रामवर नुकतीच सुतापानं एक पोस्ट शेअर केली आहे. इरफानच्या कॅन्सरवर लंडन येथील ज्या हॉस्पिटलमध्ये उपचार केले होते त्या हॉस्पिटलचा फोटो या पोस्टमध्ये सुतापानं शेअर केला आहे. या पोस्टसोबत सुतापानं इमोशनल कॅप्शन देत सीबीडी ऑईल काय.देशीर करण्याची मागणी केली आहे.

सध्या मी लंडनमध्ये आहे. लंडनमध्ये पुन्हा येणं आणि हॉस्पिटलच्या त्या खोलीला बाहेरून फक्त न्याहाळत राहणं. इरफान इथे असताना मी हेच करत असायचे, असा कॅप्शन सुतापानं या पोस्टला दिला आहे. या कॅप्शनच्या शेवट हॅशटॅग वापरत सुतापानं सीबीडी ऑईल भारतात काय.देशीर करण्याची मागणी केली आहे.

#LegalaizeCBDoilinIndia म्हणजेच सीबीडी ऑइल भारतात काय.देशीर केलं जावं, असं सुतापानं या कॅप्शनच्या शेवट लिहिलं आहे. सुतापाच्या या मागणीमुळे काहीजण सुतापावर टी.का करत आहेत तर काहीजण सुतापाला पाठींबा देत आहेत.

दरम्यान, अभिनेत्री श्रद्धा कपूर, सारा अली खान, दीपिका पादुकोण आणि नम्रता शिरोडकर या सध्या अं.मली पदार्थ प्रकरणी एनसीबीच्या र.डारवर आहेत. शनिवारी दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांना चौकशीसाठी एनसीबी कार्यालयात बोलावण्यात आलं होतं. आपण केव्हाच ड्र.ग्जच सेवन केलं नसल्याचं तिनही तारकांनी एनसीबीच्या चौकशी दरम्यान सांगितलं आहे.

अभिनेत्री सारा अली खाननं यावेळी सुशांत आणि तिच्या रिलेशन विषयी सुद्धा कबूली दिली आहे. ‘केदारनाथ’ चित्रपटावेळी मी आणि सुशांत रिलेशनमध्ये होतो, अशी कबूली सारा अली खाननं यावेळी दिली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘त्या’ प्रकरणी कंगना चुकिचीच, कंगनाला खडे बोल सुनावताना उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणाले…

अभिनेत्री कंगणा राणावतचा बीएमसीवर अत्यंत गंभीर आरोप; म्हणाली, माझ्या शेजाऱ्यांना…

‘सुशांत प्रकरणी ‘हे’ काम करण्यासाठी रियानं मोठं षडयंत्र आखलं होतं’; एनसीबीचा धक्कादायक खुलासा!

मुकेश अंबानी प्रत्येक तासाला कमवत आहेत 90 कोटी रुपये, एकुण संपत्ती ऐकाल तर हैराण व्हाल!

सुशांतला वि.ष दिलं गेलं होतं? मेडिकल रिपोर्टनं केला धक्कादायक खुलासा!