अभिनेते मकरंद अनासपुरे शेतकऱ्यांसाठी मैदानात, सरकारकडे केली मोठी मागणी!

Makrand Anaspure | बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे आयोजित ‘कृषिक 2025’ या भारतातील सर्वात मोठ्या कृषी प्रदर्शनाला अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी भेट दिली. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव मिळत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली आणि शेतकऱ्यांनी सामूहिक शेती करावी, असे आवाहन मराठी अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी केले.

काय म्हणाले मकरंद अनासपुरे?

“शेतकऱ्यांचा माल आहे म्हटलं की त्याची बार्गेनिंग सुरू होते. पण एखाद्या मॉलमध्ये वस्तू घेताना बार्गेनिंग केलं जात नाही,” अशी खंत मकरंद अनासपुरे यांनी बोलून दाखवली. “शेतकऱ्यांकडे पिकवायची क्षमता आहे, पण साठवून ठेवण्याची क्षमता नाही. म्हणून त्याचा माल कवडीमोल (Dirt Cheap) भावाने विकावा लागतो,” असेही ते म्हणाले. सरकारने शेतकऱ्यांच्या मालाचा हमीभाव ठरवला पाहिजे, अशी मागणी (Makrand Anaspure) त्यांनी केली.

शेतकऱ्यांनी शेतीची पद्धत बदलावी तसेच सामूहिक शेती सुरू करावी, असे आवाहन अनासपुरे यांनी केले. शेतमालाचे बार्गेनिंग केले जाते परंतु एखाद्या मॉलमध्ये वस्तू घेताना बार्गेनिंग केले जात नाही, असेही ते म्हणाले. “शेतकऱ्यांचा शेतमाल कवडीमोल दराने घेतला जात आहे, त्यामुळे सरकारने शेतमालाचे हमीभाव ठरवावेत,” अशी मागणी (Makrand Anaspure) त्यांनी केली.

सैफ अली खानवरील हल्ल्याचा निषेध-

अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात विचारले असता मकरंद अनासपुरे यांनी या घटनेचा निषेध केला. “सैफ अली खान काय कुणावरही अशा पद्धतीचा हल्ला झाला तर त्याचा निषेधच आहे. या प्रकरणाची चौकशी होऊन कडक असे शासन झाले पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली. तसेच, “महाराष्ट्र हा जातीपातीत वाटून चालणार नाही, सगळ्यांनी एकत्र राहूनच काम केले पाहिजे,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रात भरवण्यात आलेले ‘कृषिक2025’ हे भव्य कृषी प्रदर्शन 16 जानेवारीपासून सुरू झाले असून ते 20 जानेवारीपर्यंत सर्वांसाठी खुले असणार आहे. या प्रदर्शनात आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने शेती क्षेत्रात केलेले यशस्वी प्रयोग पाहायला मिळतात. यामध्ये तंत्रज्ञानाचा वापर करून केलेली ऊस शेती (Sugarcane Farming) विशेष आकर्षण ठरत आहे. या प्रदर्शनाला भेट देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

News Title : makrand anaspure demands MSP for agricultural produce

महत्त्वाच्या बातम्या-

शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! ‘या’ शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे पैसे मिळणार नाही

पुरुषांच्या प्रायव्हेट पार्टबद्दल करिना कपूरचं विधान चर्चेत!

लाडकी बहिण योजनेबाबत महत्त्वाची अपडेट समोर!, अदिती तटकरेंनी दिली मोठी माहिती

बीडमध्ये नेमकं चाललंय तरी काय?, आणखी एक खंडणीचा धक्कादायक प्रकार समोर!

लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच एवढे रुपये जमा होणार! आदिती तटकरेंचा मोठा खुलासा