Valentine’s Day | ‘तु माझा आहेस’; मलायकाने शेअर केला अर्जुनसोबतचा रोमॅन्टिक फोटो

मुंबई | ऐन थंडीच्या मोसमात प्रेमाचा बहार आणणारा आठवडा म्हणून व्हेलेंटाईन विक साजरा करण्यात येतो. प्रेमी जोडपं आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी वर्षभर या आठवड्याची वाट पहात असतात.

14 फेब्रुवारी हा व्हेलेंटाईन दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. आजच्या दिवशी प्रत्येक शहरात, गावात प्रेम करणाऱ्यांची तुफान गर्दी पहायला मिळते. परिणामी आज प्रेमाचा पुर येतो, असंही म्हटलं जातं.

आपल्या अदाकारीनं प्रेक्षकांच्या मनावर आणि सिनेजगतात प्रसिद्ध असणारे काही चेहरेही आपापल्या साथिदारांना आज शुभेच्छा देत आहेत. यामध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेण्याचं काम एका अभिनेत्रीनं केलं आहे.

बाॅलिवूडमधील प्रसिद्ध जोडी म्हणून सध्या मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरला ओळखलं जातं. या दोघांच्या नात्याबद्दल अनेकदा चर्चा देखील झाल्या आहेत.

अर्जुन आणि मलाइका दोघेही आपल्या प्रेमाची कबूली देत नसले तरी त्यांचं नात आता जगापासून लपून राहिलेलं नाही. दोघांना अनेकदा एकत्रित पाहिलं गेलं आहे.

व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छा देण्यासाठी मलायकानं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून दोघांचा एक रोमॅन्टिक फोटो शेअर केला आहे. तु माझा आहेस, असं छान कॅप्शन दिलं आहे. सध्या हा फोटो सर्वांच्या चर्चेचं कारण बनला आहे.

मलाइकानं या फोटोत अर्जुनला मिठी मारली आहे. अर्जुन मलाइकाच्या कपाळावर किस करत आहे. दोघांच्या रोमॅन्टिक भेटीचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

मलायका आणि अर्जुनच्या वयात मोठं अंतर आहे. मलायका ही अर्जुनपेक्षा तब्बल 12 वर्षांनी मोठी आहे. पण दोघांमध्ये प्रेम आहे आणि ते आता लपून राहिलेलं नाही.

महत्त्वाच्या बातम्या – 

 “काँग्रेस बुडवण्यासाठी इतर कुणाचीही गरज नाही, राहुल-प्रियांकाच पुरेसे आहेत”

‘आय रिपीट, भाजपचे साडे तीन नेते…’; संजय राऊतांच्या नव्या दाव्याने खळबळ 

डॉ. सुवर्णा वाजे प्रकरणी आणखी एक धक्कादायक खुलासा समोर

राकेश झुनझुनवालांना मोठा झटका; एका दिवसात झालं ‘इतक्या’ कोटींचं नुकसान 

“महिला हिजाब घालत नाही म्हणून बलात्कार होतात”