राष्ट्रवादीला मोठा धक्का; मालेगावच्या 20 नगरसेवकांची ‘हे’ कारण देत पक्षाला सोडचिठ्ठी!

नाशिक |  राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. अनेक बडे नेते सोडून गेल्यानंतर मालेगाव महानगरपालिकेतल्या 20 नगरसेवकांनी पक्षाला अलविदा केलं आहे.

मालेगावचे माजी आमदार मुफ्ती इस्माईल यांच्यासह महानगरपालिकेतल्या 20 नगरसेवकांनी राजीनामा दिला आहे. परंतू पक्ष सोडून गेलेल्या नेत्यांपेक्षा या नगरसेवकांनी मात्र वेगळं कारण देत पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

राज्यसभेत नुकतेच ‘तीन तलाक’ विधेयक मंजूर झालं. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार राज्यसभेत उपस्थित राहिले नाहीत आणि त्यांनी राज्यसभेत त्या विधेयकाला विरोधही केला नाही, असं कारण देत या नगरसेवकांनी पक्ष सोडला आहे.

राष्ट्रवादीचा राजीनामा जरी दिलेला असला तरी त्यांनी अद्याप कोणत्या पक्षात प्रवेश करणार? हे आणखी सांगितलेलं नाहीये.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीला घरघर लागली आहे. पवारांच्या विश्वासातले अनेक सहकारी त्यांची साथ सोडत आहे.

सचिन अहिर, मधुकर पिचड, वैभव पिचड, संदीप नाईक, चित्रा वाघ यांनी पवारांना धक्का देत सत्ताधारी भाजपात प्रवेश केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मुख्यमंत्रीपद दिलं तर घेणार का?? चंद्रकांत पाटलांच्या उत्तराने उपस्थित अवाक

-ठरलं! येवल्यात छगन भुजबळांना टक्कर द्यायचा शिवसेनेचा प्लॅन तयार…

-“विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सुपडासाफ होईल”

-शपथ घालून तरी कार्यकर्ते थांबतील का??; मुख्यमंत्र्यांच्या रडारवर राष्ट्रवादी!

-मला ‘ईडी’च्या चौकशीचा काहीही फरक पडत नाही- राज ठाकरे