“मलिकांनी बाॅम्बस्फोट प्रकरणातील व्यक्तींकडून जमीन का घेतली?”

मुंबई | एनसीबीच्या कारवाईवरून राज्यात सुरू झालेला गोंधळ थांबण्याचं नाव घेत नाही. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांच्यावर खळबळजनक आरोप केले आहेत.

दिवाळीपूर्वीच फडणवीस यांनी दिवाळीनंतर आपण मोठा धमाका करणार असल्याचं सांगितलं होतं. परिणामी आज फडणवीस यांनी मलिक यांच्यावर थेट मुंबई बाॅम्बस्फोट हल्ल्यात सहभागी असलेल्या लोकांसोबत व्यवहार केल्याचा अरोप केला आहे.

1993 च्या मुंबई बाॅम्बस्फोटातील आरोपींकडून मलिक यांनी स्वस्तात जमीन खरेदी केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. परिणामी या प्रकरणाला आता नवीन वळण लागलं आहे.

फडणवीस यांनी मलिक यांच्यावर आरोप करताना मुंबई बाॅम्बस्फोट खटल्यातील आरोपींची यादीच वाचून दाखवली आहे. सरदार शाह वली खान, सलीम पटेल, गोवावाले यांच्यामाध्यमातून मलिक यांना जमीन हस्तांतरण झाल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

कुर्ल्यात एनबीएक्स रोडवर गोवावाल्याची जागा होती. या जागेच्या व्यवहारात मलिक यांचा हात असल्याचा गौप्यस्पोट यावेळी फडणवीस यांनी केला आहे.

मोक्याच्या ठिकाणी असलेली जागा साॅलिडस नावाच्या कंपनीनं घेतील होती. मंत्री नवाब मलिक या कंपनीच्या संचालक पदावर कार्यरत होते. परिणामी त्यांचा हात या प्रकरणात आहे, असा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

20 लाखात एलबीएस रोडवर जमीन खरेदी करण्यात आली. ही रक्कम सलीम खान आणि शाह वली खान यांनी देण्यात आली असंही फडणवीस म्हणाले आहेत.

पाॅवर ऑफ अटर्नीमध्ये वेगळी, व्यवहार होताना वेगळी आणि प्रत्यक्षात वेगळी अशा वेगवेगळ्या किंमती देण्यात आल्यानं या प्रकरणाचा गुंता लक्षात येतो, असंही फडणवीस म्हणाले आहेत.

दरम्यान, फडणवीस यांच्या आरोपांवर उत्तर देण्यासाठी  नवाब मलिक यांनी 2 वाजता पत्रकार परिषद आयोजित केली आहे. परिणामी या दोन्ही नेत्यांमधील वाद वाढण्याची चिन्ह आहेत.

आपल्या पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी मलिक यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. मलिक यांच्याविरोधातील सर्व पुरावे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना देणार असल्याचं फडणवीस म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 

  कर्णधारपद सोडल्यावर विराटची भावूक प्रतिक्रिया, म्हणाला…

  अभिनेत्री पूनम पांडेच्या पतीला पुन्हा मुंबई पोलिसांकडून अटक

  कचोरीसोबत कांदा न दिल्यामुळे तरुणीचा राडा, पाहा व्हिडीओ

  “2 वर्ष प्रयत्न करुनही ठाकरे सरकार मजबूत, आमचं काय उखडणार?”

“माझा विषय आला की सगळे ढवळाढवळ करतात, आता मी ढवळाढवळ करू का?”