मुंबई | राज्याचे माजी देेवेंद्र फडणवीस आणि राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्यात सध्या जोरदार राजकीय जुगलबंदी चालू आहे. 2 ऑक्टोबर रोजी मुंबईत एका क्रुझवर कारवाई करत एनसीबीनं ड्रग्ज पार्टीचा खुलासा केला होता. या कारवाईत प्रसिद्ध बाॅलिवूड अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली होती.
आर्यन खानच्या अटकेनंतर या प्रकरणानं अनेक नवीन वळणं घेतली आहेत. एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्या कार्यशैलीवर महाविकास आघाडी सरकारनं आक्षेप घेतल्यानं त्यांना या प्रकरणाच्या तपासातून काढण्यात आलं आहे.
ड्रग्ज प्रकरणावरून मलिक यांनी फडणवीस यांच्यावर ड्रग्ज माफियांशी संबंध असल्याचे काही पुरावे सादर केले होते. त्यानंतर राज्यात प्रचंड गदारोळ माजला आहे.
ड्रग्ज ट्राफिकिंगच्या प्रकरणात अटकेत असलेला जयदिप राणा याचे फडणवीस यांच्यासोबत आणि अमृता फडणवीस यांच्यासोबत काढलेले फोटो व्हायरल झाल्यानं मलिक आणि फडणवीस यांच्यात मोठा वाद झाला होता.
अमृता फडणवीस यांनी सर्व आरोप फेटाळून लावले होते. नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेला आम्ही घाबरत नसल्याचं अमृता फडणवीस म्हणाल्या होत्या.
नवाब मलिक यांची कन्या निलोफर मलिक यांनी अमृता फडणवीस यांना ट्विटरच्या माध्यमातून चांगलंच प्रत्यूत्तर दिलं आहे. तुम्ही काही केलंच नाही तर नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदेस घाबरता कशाला?, असा सवाल निलोफर यांनी अमृता फडणवीस यांना विचारला आहे.
सत्य जर तुमच्या बाजूनं असेल तर तुम्ही घाबरू नका. जर तुमचे काही वाईट हेतू असतील तर ते बाहेर काढले जातील, असा टोला निलोफर मलिक यांनी लगावला आहे.
ड्रग्ज प्रकरणात नाव आल्यानं देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस या दोघांनी मलिक यांच्यावर जोरदार टीका केली आहे. विरोधी पक्ष भाजपनं मलिक यांचे आरोप बिनबुडाचे असल्याचं म्हटलं आहे.
दरम्यान, दोन्ही नेते दररोज पत्रकार परिषद घेत यथेच्छ टीका करत आहेत. एनसीबीच्या कारवाईपासून चालू झालेलं हे प्रकरण आता 1993 च्या मुंबई बाॅम्बस्फोटापर्यंत गेलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
‘…हे आधी तुम्ही सिद्ध करा’; मुंबई उच्च न्यायालयाचा ज्ञानदेव वानखेडेंना झटका
“भाजपनं मशीन तयार केलीये, त्यात सगळे स्वच्छ होतात”
“अडवाणी जिथे जिथे गेले तिथे त्यांनी द्वेषाची बीजे पेरली”
मुख्यमंत्र्यांकडून नवाब मलिकांचं कौतुक, म्हणाले…’गुड गोईंग’
‘पद्म पुरस्कारासाठी मी लायक नाही’; आनंद महिंद्रा यांचं वक्तव्य चर्चेत