राधाकृष्ण विखे पाटील पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर?; मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले…

मुंबई | नागपुरात झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या वेळी मल्लिकार्जुन खर्गे आणि राधाकृष्ण विखे पाटील यांची एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बंद दाराआड चर्चा झाल्याचं वृत्त एका दैनिकानं दिलं आहे. त्यानंतर विखे पाटील माघारी फिरणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. यावर काँग्रेस सरचिटणीस आणि महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी विखेंशी भेटीच्या चर्चा धुडकावून लावल्या आहेत.

मला कोणीही भेटलेलं नाही. माझी कुणाशी चर्चा झाली नाही. मला याबाबत काही माहिती नाही, असं मल्लिकार्जुन खर्गे यांनी म्हटलं आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

राधाकृष्ण विखे पाटील अहमदनगरमधून भाजपच्या तिकीटावर विधानसभेवर निवडून आले आहेत. परंतु विखेंनी पाडापाडी केल्याचा आरोप माजी मंत्री राम शिंदे, माजी आमदार शिवाजी कर्डिले, स्नेहलता कोल्हे यांच्यासह स्थानिक नेत्यांनी केला होता.

दरम्यान, काल मुंबईमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप आमदार राधाकृष्ण विखे पाटील, खासदार सुजय विखे पाटील, माजी मंत्री राम शिंदे आणि अहमदनगरमधील भाजप नेते यांच्यात बैठक झाली होती.

महत्वाच्या बातम्या-