ममता बॅनर्जींची मोठे वक्तव्य; केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर पंतप्रधान मोदी करत नाहीत, तर भाजप…

नवी दिल्ली | सक्तवसुली संचलनालय (Enforcement Directorate) आणि केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) या दोन स्वायत्त संस्था आहेत. पण अलीकडील काळात केंद्र सरकार राज्य सरकारे पाडण्यासाठी आणि विरोधी पक्षांना कमी करण्यासाठी या संस्थांचा गैरवापर करत असल्याचा आरोप सर्व विरोधी पक्ष करत आहेत.

आता यावर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी भाष्य केेले आहे. ईडी आणि सीबीआयच्या गैरवापरामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आहेत, असे मला वाटत नाही, असे बॅनर्जी म्हणाल्या.

मला वाटते हे भाजप नेत्यांचे काम असावे, असा आरोप करत त्यांनी पंतप्रधान मोदींची पाठराखण केली आहे. त्यांना लोक पंतप्रधानांचे मोठे विरोधक मानत असल्यामुळे त्यांच्या या वक्तव्याने आता त्या चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत.

सीबीआय (CBI), ईडी (ED), आयटी (IT) आणि इतर केंद्रीय तपास यंत्रणांच्या भूमिकेविरोधात बंगाल विधानसभेत तृणमूल (TMC) पक्षाने ठराव मंजूर केला. यावेळी ममता बॅनर्जी बोलत होत्या.

यावेळी विधानसभेत चर्चेदरम्यान बॅनर्जी म्हणाल्या, मला वाटत नाही पंतप्रधान या यंत्रणांचा (केंद्रीय तपास यंत्रणांचा) गैरवापर करत आहेत. कारण त्या त्यांच्या अखत्यारीत येत नाहीत.

सीबीआय, ईडी त्यांच्या अधिकारात येत नाही. हे सर्व गृहमंत्रालयाच्या अधिकारात येत आहे. त्यामुळे भाजप नेत्यांकडून यांचा गैरवापर केला जात आहे, असा आरोप यावेळी बॅनर्जींनी केला. त्यामुळे त्यांनी अप्रत्यक्ष अमित शहा यांच्यावर आरोप केला.

देशातील उद्योजक ईडी आणि सीबीआयच्या गैरवापराल घाबरुन देश सोडून पळ काढत आहेत, अशे बॅनर्जी म्हणाल्या. यावेळी बोलताना त्यांनी भाजपची तुलना हिटलर, स्टॅलिन आणि मुसोलिनी सोबत केली. त्या म्हणालया या सर्वांना भाजपने मागे टाकले आहे.

महत्वाच्या बातम्या – 

“5 सप्टेंबरला अग्रवाल मोदींना भेटले आणि…” रोहीत पवार यांचे वेदांतावर मोठे वक्तव्य

आशिष शेलारांचा राष्ट्रवादीला मोठा दणका; म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस हा फक्त दोन-अडीच…

‘दारुच्या नशेत असल्याने…’; पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप

वॉट्सएपचे नवीन अपडेट देणार आहे ‘हे’ नवीन फिचर्स; सर्वांना याचीच प्रतीक्षा होती

“…तर महाराष्ट्रातील महिला वर्ग रामदास कदमांची जोड्याने पूजा करील” – भास्कर जाधवांची मोठी टीका