देश

भाजप खासदार म्हणतो ‘या’ महिलेला काँग्रेस अध्यक्ष बनवा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या दारुण पराभवानंतर राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आता काँग्रेस पक्ष अध्यक्षपदाची धुरा कोणाच्या हाती द्यावी याच्या शोधात आहे. 

भाजप हा एकच पक्ष राहिला तर लोकशाही धोक्यात येईल. त्यामुळे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा कार्यभार सांभाळावा, असा सल्ला राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी काँग्रेसला दिला आहे. 

तृणमूल काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विलीनीकरण करायला हवं, असं सुब्रमण्यम स्वामी म्हणाले आहेत. त्यांनी शुक्रवारी एका ट्वीटमधून काँग्रेसला सल्ला दिला आहे.

शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काँग्रेसमध्ये एकीकृत विलीनीकरण करण्याचाही सल्ला सुब्रमण्यम स्वामींनी दिला आहे.

इटालियन्स आणि वंशजांना पक्ष सोडायला सांगा. तरच ममत बॅनर्जी अध्यक्ष होऊ शकतात. त्यानंतर राकांपानेदेखील काँग्रेसमध्ये समाविष्ट होण्याचा सल्ला सुब्रमण्यम स्वामींनी दिला आहे.

दरम्यान, राहुल गांधींनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर प्रियांका गांधींनीही त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले.

 

IMPIMP