“भाजप हा दंगाबाज आणि भ्रष्टाचारी पक्ष, त्यांना लोकशाही नष्ट करायचीये”

नवी दिल्ली | देशात पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा जोर आता कमी झाला आहे. शेवटच्या टप्प्यातील मतदान 7 तारखेला पार पडल्यानंतर आता निकालाचा अंदाज लावण्यात सर्वजण गुंतले आहेत.

देशातील पाच राज्यांमध्ये म्हणजेच उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, मणिपूर, पंजाब भाजप विरूद्ध सर्व विरोधक असा सामना रंगला होता. सर्वात जास्त चुरशीची लढाई उत्तर प्रदेशमध्ये रंगली होती.

उत्तर प्रदेश निवडणुकीत समाजवादी पक्षाच्या प्रचारासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जोर लावल्याचं पहायला मिळाल होतं. यावरून सुरू झालेलं राजकारण आणखीन थांबलेलं नाही.

भाजप हा दंगाबाज आणि भ्रष्टाचार करणारा पक्ष आहे. भाजपला देशातील लोकशाही नष्ट करायची आहे, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी भाजपवर केली आहे. परिणामी ममता आणि भाजपमधील वाद वाढण्याची शक्यता आहे.

ममता बॅनर्जी यांनी भाजपला 2024 साली केंद्रातून हाकलण्यासाठी मला आपली साथ हवी आहे, असं भावनिक आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केलं आहे. ममता तृणमूल काॅंग्रेसच्या कार्यक्रमात बोलत होत्या.

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीवेळी भाजप आणि तृणमूल काॅंग्रेसमध्ये जोरदार लढत झाली होती. पण बंगालच्या जनतेनं ममतांना परत एकदा सत्तेत आणल्यानं भाजप आणि ममता यांच्यातील संघर्ष वाढला आहे.

दार्जिलींगच्या मुद्द्यावरही ममतांनी आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांना खडे बोल सुनावले आहेत. सर्वांनी सोबत येऊन दार्जिलींगचा विकास करायचा आहे, असं ममता बॅनर्जी म्हणाल्या आहेत.

दरम्यान, आपल्या विमानाला अपघात होण्याची शक्यता होती, अशी माहिती स्वत: ममता बॅनर्जी यांनी दिल्यानंतर देशभरात खळबळ माजली आहे. ममता बॅनर्जी यांनी केंद्र सरकारनं याची चौकशी करण्याची विनंती केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“अजित पवार तुमच्या शब्दाला काडीची किंमत नाही, मोठेपणा दाखवायचा बंद करा”

Women’s Day निमित्त महिला पोलिसांना मोठं गिफ्ट; आता ‘इतक्या’ तासांची असणार शिफ्ट 

शिवसेनेच्या 25 आमदारांच्या नाराजीबाबत संजय राऊतांचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

आदित्य ठाकरेंच्या जवळच्या व्यक्तीच्या घरावर आयकर विभागाची धाड! 

निवडणुकीच्या निकालाआधीच काँग्रेस सावध; घेतला ‘हा’ मोठा निर्णय