कोलकाता | देशात काही दिवसांपासून शाळकरी मुलांच्या गणवेशाचा वाद जोरदारपणे चालू आहे. कर्नाटकमध्ये पहिल्यांदा या वादाला सुरूवात झाली.
कर्नाटकमध्ये शाळकरी मुलींना हिजाब घालून येण्यास बंदी घालण्यात आल्यानं देशात धार्मिक वातावरण तयार झाल्याचं पहायला मिळालं होतं.
कर्नाटक उच्च न्यायालयानं यावर स्पष्ट शब्दात ताशेरे ओढत सर्वांना एकसारखाच गणवेश असायला हवा आणि शाळेच्या व्यवस्थापन समितीचा निर्णय अंतीम असल्याचा निकाल दिला आहे.
कर्नाटकनंतर आता पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जी लवकरच एकसारखा गणवेश घालण्याची सक्ती करण्याची शक्यता आहे.
बंगालमधील सर्व शासकिय, निमशासकिय, खाजगी शाळांमध्ये एकसारखाच निळ्या आणि पांढऱ्या रंगाचा गणवेश असणार आहे. पूर्व प्राथमिक ते आठवी, सहावी ते आठवी, मुल-मुली या सर्वांना वेगवेगळ्या पद्धतीत डिझाईन केलेला ड्रेस देण्यात येणार आहे.
नवीन गणवेशात बंगाल सरकारचा बिस्वा बंगला हा लोगो असणार आहे. या लोगोची संकल्पना आणि डिझाईन स्वत: ममता बॅनर्जींनी केलं आहे.
राज्य सरकार नवीन गणवेश वाटपासाठी एमएसएमई विभागाला सहभागी करून घेणार आहे. तसेच सर्व विद्यार्थ्यांना गणवेशासह स्कूल बॅगचे वाटप करण्यात येणार आहे.
दरम्यान, ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं बंगालमध्ये एक रंग योजना अंमलात आणली होती. त्यानंतर आता निळ्या-पांढऱ्या रंगाचा गणवेशही त्याचाच एक भाग असल्याची चर्चा आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
“30 वर्षांनी तुमच्या मुलींना पण हिजाब घालावा लागेल”; भाजप नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य
Weather Update: पुढील 12 तास धोक्याचे, ‘या’ भागात कोसळणार पाऊस
…म्हणून रात्री बारा वाजता खांद्याला बॅग लटकवून रस्त्यावर धावत होता मुलगा, पाहा व्हिडीओ
पेट्रोल डिझेलच्या दरात काय बदल झाला, वाचा एका क्लिकवर
‘… तर तिसरं महायुद्ध होणार’; युक्रेनच्या राष्ट्रपतींचं मोठं वक्तव्य