माझ्या आईला त्यांने असं मारल, मुलीनेच सांगितले ‘त्या’ रात्रीच रहस्य

इंदूर- संसारात वाद हे होतच असतात तरीही तो नेटाने पुढे न्ह्यायचा असतो पण तो पुढे त्यांचाच जातो ज्यानां दारुच व्यसन नसत. दारुमुळे कितीतरी जनांचे संसार उघड्यावर आलेत. हे आपण उघड्या डोळ्यांनीच रोज बघतोय तरीसुध्दा लोकांच दारुच व्यसन काही केल्या सुटत नाही अशाच एका दारुड्याने व्यसनाच्या आहारी जाऊन आपल्या बायकोचाच गळा घोटला.

हा धक्कादायक प्रकार मध्यप्रदेश मधील इंदूर येथे घडला. घर चालवण्यासाठी तु पैसे का आणत नाहीस?… हा प्रश्न विचारतच त्यांने बायकोचा गळा साडीने आवळला ती आरडा ओरडा करायला लागल्यावर तिच्या तोंडाला उशी लावली व तोंडही दाबल आणि तिची हत्या केली . अशी माहीती स्वत: त्याच्या मुलीनेच पोसिसांना दिली.

तो स्वत:च बायकोचे अंतिमसंस्कार करुन येत असताना पोलिसांनी त्याला पकडल व त्या वेळी त्यांच्या मुलीनेच घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. तीने सांगितले  माहीतीनूसार ममता नगरमध्ये रिना आणि मनिष हे जोडपं राहतं. मनिष हा नोकरी करतो. मात्र आपला सगळा पैसा दारूमध्ये वाया घालवतो. त्यातून नवरा बायकोची कायम भांडणं होत असे. सगळे पैसे दारुत जात असल्याने मनिष हा बायकोला कमाई करून पैसे आणण्यास सांगत होता. अशी सर्व माहीती प्राचीनेच पोलिसांना दिली.

तसेच वडील आईला कायम मारायचे त्या दिवशी रात्री त्यांनी आईच्या अंगावरती बसून तिचा गळा साडीने आवळल्याचे धक्कादायक वास्तवही प्राचीनेच पोलिसांना सांगितले.

महत्वाच्या बातम्या-

-मुलांसोबत खेळली म्हणून बापाने केली मुलीलाअमानुष शिक्षा, मुलीची आत्महत्या

-‘ती’ राजी झाली नाही म्हणून अंगावर राॅकेल ओतून जाळल

-आधि गळा दाबून मारल, नंतर केला अत्याचार मुंबईत घडला ‘हा’ धक्कादायक प्रकार