देश

बालपणापासूनच्या ते गेल्या 18 वर्षापर्यंत मोदींनी सांगितल्या ‘या’ सगळ्या गोष्टी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिस्कव्हरी चॅनेलवरील बियर ग्रिल्सचा लोकप्रिय शो ‘मॅन वर्सेस वाइल्ड’मध्ये खास पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. फेब्रुवारी महिन्यात उत्तराखंडमधील जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यानात या विशेष भागाचं चित्रिकरण झालं होतं. या शोच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला. मोदी आणि बियर ग्रिल्स यांच्यात निसर्गावर चर्चा झाली.

जेव्हा जिम कार्बेटला बियर ग्रिल्सनं खतरनाक म्हणाले. तेव्हा आपण निसर्गाशी संघर्ष करतो तेव्हा ते निसर्गासह सर्वांसाठीच धोकादायक असतं. पण जेव्हा आपण त्याच्याशी संतुलन राखून राहतो तेव्हा आपल्यालाच लाभ होतो, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले आहेत. 

अत्यंत गरीबीत बालपण गेलं. त्याकाळी अंघोळीचा साबण, कपडे धुण्याचा साबण आणायला पैसे नसायचे. त्यावेळी पानांवर जमा झालेलं मीठ गोळा करून त्याचा उपयोग अंघोळीसाठी आणि कपडे धुण्यासाठी करायचो, असं मोदींनी बालपणाबद्दल सांगितलं. 

मोदींची कपड्यांची निवड किंवा त्याबद्दल अनेकांना उत्सुकता आहे. पण लहानपणापासूनच त्यांना टापटीप रहायला आवडतं. त्यावेळी तांब्याच्या भांड्यात गरम कोळसा टाकून कपडे इस्त्री करायचो त्याची आठवण मोदींनी सांगितली.

निसर्गावर प्रेम करण्याचं बाळकडू घरीच मिळालं असं मोदी म्हणाले. त्यांनी आजीची एक आठवण सांगितली. माझ्या काकांनी लाकडाचा व्यवसाय करण्याचं ठरवलं. हे आजीला समजलं तेव्हा ती नाराज झाली. नाराजीचं कारण विचारल्यावर आजी म्हणाली उपाशी मरू पण लाकूड विकायचं काम नाही करणार, लाकडातही जीवन आहे. त्या झाडाला कापून घर चालवणं योग्य नाही, असं मोदींनी सांगितलं. 

मॅन वर्सेस वाइल्डच्या शोमध्ये बियर ग्रिल्सनं लिंबाच्या झाडाचे औषधी गुणधर्म सांगितले. त्यावेळी भारतात प्रत्येक झाडाला देव मानलं जातं. इथं तुळशी विवाहाची परंपरा आहे. तुळशीचं देवाशी लग्न लावलं जातं, असं मोदींनी बेअर ग्रिल्सला सांगितलं. 

महत्वाच्या बातम्या-

-कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात येत्या दोन दिवसात मुसळधार पावसाचा इशारा

-अमित शहा स्वातंत्र्यदिनी जम्मू काश्मीरमध्ये तिरंगा फडकवण्यासाठी जाणार?

-तक्रार करणाऱ्या पूरग्रस्ताला चंद्रकांत पाटलांची दमदाटी

-पूरग्रस्तांच्या मदतीसाठी रितेश देशमुखने केली 25 लाखांची मदत

-अकोट विधानसभा मतदारसंघात स्थानिक उमेेदवारीसाठी भाजपकडून कँम्पेन

IMPIMP