युवक काँग्रेसला मोठा झटका; गटबाजीला कंटाळून सच्च्या शिलेदाराचा राजीनामा

मुंबई – महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसमध्ये सारं काही आलबेल नसल्याचा प्रकार समोर आला आहे. संघटनेमध्ये गटबाजीला उधाण आल्याचं चित्र आहे. याच गटबाजीला कंटाळून युवक काँग्रेसचे सरचिटणीस मानस पगार यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. सोशल मीडियात त्यांनी आपल्या राजीनाम्याचं पत्र टाकलं आहे.

काँग्रेस पक्षाबद्दल असलेल्या विशेष आस्थेमुळे मी युवक काँग्रेसमध्ये एक सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून प्रवेश घेतला होता. युवक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून गेल्या ३ वर्षात मी पक्षाची विचारधारा तळागाळातील तरुणांपर्यंत पोहोचवण्याचा पूर्ण ताकदीनिशी प्रयत्न केला. प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी वेळोवेळी दिलेली जबाबदारी कसोशीने पार पाडली, असं मानस पगार यांनी आपल्या पत्रात म्हटलं आहे.

मानस पगार यांनी युवक काँग्रेसचा खास प्रोजेक्ट मानल्या गेलेल्या सुपर ४० तसेच सुपर ६० मध्ये काम केलं आहे. विधानसभा निवडणुकीत पक्षाला या प्रोजेक्टचा चांगलाच फायदा झालेला दिसला. मात्र आता वैयक्तिक कारण पुढे करत तसेच तसेच कामाचा व्याप वाढल्याचं सांगत पगार यांनी राजीनामा दिला आहे.

राज्यात सत्ता असताना पक्षसंघटना मजबूत करण्याची तसेच तरुणांची चांगली फळी उभी करण्याची संधी सरकारमधील घटकपक्षांना आहे. मात्र गटबाजीमुळे काँग्रेसपुढील अडचणी वाढत आहे. पक्षसंघटनेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना दूर लोटलं जात आहे. आगामी काळात पक्षाला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आणखी काही तरुण युवक काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याच्या मनस्थितीत असल्याची माहिती आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांत प्रकरणाचं गूढ उकलणार; मानसोपचार तज्ज्ञांनी केला सर्वात मोठा खुलासा!

फक्त सुशांतच नाही तर रियाही गांजा ओढायची; पाहा कुणी केला हा धक्कादायक खुलासा

रिया चक्रवर्ती आणि तिच्या भावामधील धक्कादायक चॅटिंग आलं समोर, पाहा काय आहे चॅट

सुशांतप्रकरणी मोठी बातमी! रियाच्या घरी छापा टाकत ‘या’ व्यक्तीला एनसीबीनं घेतलं ताब्यात

‘या’ कारणामुळे शरद पवार चिंताग्रस्त; राष्ट्रवादीच्या खासदारांसह माजी अधिकाऱ्यांची बैठक