Top news खेळ

तीनच दिवसांपूर्वी झालं वडिलांचं निधन, आज केली वडिलांना अभिमान वाटेल अशी कामगिरी!

शारजाह | यूएईमध्ये सुरु असलेल्या आयपीएलमध्ये जसा जोश पहायला मिळत आहे, तशाच प्रकार याठिकाणी काही आनंद तसेच दुःखाचे क्षणही पहायला मिळत आहे. असाच एक भावुक क्षण शारजाहच्या मैदानावर पहायला मिळाला.

किंग्ज इलेव्हन पंजाबचा फलंदाज मंदीप सिंगने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात आपल्या तडाखेबाज खेळीचं दर्शन घडवलं. त्याने धडाकेबाज अर्धशतक करुन आपल्या संघाला अत्यंत महत्त्वाचा विजय मिळवून दिला. या अत्यंत महत्त्वाच्या खेळीला एक भावनिक किनार देखील आहे.

मंदिप सिंगने 56 चेंडूत 66 धावांची खेळी केली, अवघ्या तीन दिवसांपूर्वीच त्याच्या वडिलांचं निधन झालं असतानाही त्यानं मैदानावर अत्यंत संयम राखला आणि अर्धशतकी खेळी केली. एकप्रकारे या खेळीच्या माध्यमातून त्याने आपल्या वडिलांना श्रद्धांजलीच वाहिली आहे.

आयपीएलच्या पंजाब आणि हैदराबाद यांच्या मॅचला सुरुवातच झाली ती या वाईट बातमीने… पंजाबचा खेळाडू मनदीप सिंगच्या वडिलांचं आधीच्या रात्री निधन झालं होतं, मात्र या सामन्यातही मंदीप मैदानात उतरला होता. या मॅचमध्ये हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर याने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला होता.

पंजाबची टीम बॅटिंगसाठी उतरली तेव्हा मनदीप सिंग केएल राहुलसोबत बॅटिंगसाठी आला. 14 बॉलमध्ये 17 रन करुन मनदीप यावेळी माघारी परतला होता, मात्र आता कोलकात्याविरुद्ध झालेल्या सामन्यात मंदीपनं शानदार खेळी केली आहे.

मनदीपच्या दु:खात सहभाग नोंदवण्यासाठी पंजाबची टीम हैदराबादविरुद्धच्या सामन्यात दंडाला काळी पट्टी बांधून खेळली होती. एकप्रकारे त्यांनी मंदिपला मोठा भावनिक पाठिंबा दिला होता. या दुःखातून सावरत मंदीपने आपल्या संघासाठी अत्यंत महत्त्वाची खेळी केली.

मनदीप सिंग आयपीएलसाठी युएईला जाण्यापासूनच त्याचे वडील आजारी होते. मनदीप सिंगच्या वडिलांचं निधन झाल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या तेव्हा मनदीपच्या भावाने हे वृत्त फेटाळून लावलं होतं, मात्र काही वेळानंतर पंजाबच्या टीमने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन मनदीपच्या वडिलांच्या निधनाला अधिकृत दुजोरा दिला होता.

मनदीपला कशी मिळाली संधी?

किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा ओपनर मयंक अग्रवाल दुखापतग्रस्त असल्याने काही सामन्यांमधून बाहेर झाला आहे. त्यामुळे त्याच्या जागी मनदीप सिंगला संधी देण्यात आली आहे. याआधी चेन्नईविरुद्धच्या सामन्यात मनदीपला संधी देण्यात आली होती, मात्र त्याला मोठी खेळी खेळता आली नव्हती त्यानंतर त्याला ३ सामन्यानंतर काढून टाकण्यात आलं होतं.

मनदीप सिंगने 101 आयपीएल सामन्यांमध्ये 21.63 च्या सरासरीने आणि 125 च्या स्ट्राईक रेटने 1579 धावा केल्या आहेत. मनदीपने त्याच्या आयपीएल कारकिर्दीमध्ये 5 अर्धशतकं केली असून त्याचा 77 ही त्याची सर्वात मोठी धावसंख्या आहे.

दुसरीकडे  नितीश राणाच्या सासऱ्यांचाही नुकताच मृत्यू झाला आहे. नितीश राणाने हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये अर्धशतक करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. नितीश राणाने अर्धशतक झाल्यानंतर सुरेंदर नावाची कोलकाताची जर्सी झळकावली होती. सुरेंदर हे त्याच्या सासऱ्यांचं नाव होतं.

नितीश राणाने दु:खाच्या या काळातही मैदानात उतरून टीमसाठी अर्धशतकी खेळी केली. या मोसमातली नितीशचा ही सर्वाधिक धावसंख्या होती. आता मनदीपनंही नितीशच्या पावलावर पाऊल टाकलं, त्याने आपल्या वडिलांना श्रद्धांजली वाहण्यासाठी खास अर्धशतक केलं.

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा! म्हणाली माझ्या वडिलांनीच मला…

दसऱ्याच्या मुहूर्तावर दिशा बोलली आणि ‘ती’ चर्चा पुन्हा एकदा रंगली!

भाजपला आणखी मोठा धक्का! पंकजा मुंडे शिवसेनेचा झेंडा हाती घेणार?

आनंदाची बातमी : सर्व भारतीयांना आता मोफत मिळणार कोरोनाची लस!

कंगना पुन्हा बरळली! ‘त्या’ प्रकरणी महाराष्ट्र सरकारवर अप्रत्यक्षपणे आरोप करत म्हणाली…