दिल्ली | केंद्रशासित दिल्ली शहराचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia)यांच्यावर सीबीआयची (CBI) कारवाई सुरु आहे. त्यांच्यावर कथित शिक्षण व्यवस्थेत घोटाळा प्रकरणी आरोप आहेत.
सध्या त्यांच्या राहत्या घरावर सीबीआयचे छापे सुरु आहेत. सिसोदिया उपमुख्यमंत्री असण्याबरोबरच अबकारी (Excise) मंत्री आणि शिक्षण मंत्री (Education Minister) देखील आहेत. अबकारी धोरण त्यांच्याच मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांनी तयार केले आहे.
दिल्लीचे उपराज्यपाल व्हि. के. सक्सेना (V. K. Saxena) यांनी त्यांच्यावर कथित घोटाळ्याप्रकरणी चौकशी करण्याची मागणी केली होती. आम आदमी पक्षाने त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तविली आहे.
शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या कार्याची प्रशंसा न्यूयॉर्क टाइम्सने (New York Times) देखील घेतली. त्यामुळे त्यांचे शिक्षण क्षेत्रात नाव गाजले आहे. त्यामुळे केंद्र सरकार त्यांची अटक करुन प्रतिमा मलीन करण्याचा डाव आखत असल्याचे आरोप आपने केले.
साबीआय चौकशीच्या दरम्यान सिसोदिया मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांच्यासमवेत गुजरातमध्ये निवडणूक प्रचारासाठी गेले आहेत. त्यामुळे त्यांच्या अटकेचा परिणाम निवडणुकांवर होऊ शकतो, असा अंदाज आहे.
दिल्लीत महाराष्ट्रासारखी फूट पाडण्यासाठी भाजप शिंदेंच्या शोधात आहे, असा आरोप आम आदमी पक्षाने (AAP) केला. तसेच आपच्या चार आमदारांना भाजपने 20 कोटींची ऑफर दिल्याची देखील माहिती पक्षाने दिली.
सिसोदिया यांना अटक होण्याची शक्यता फार कमी आहे, अशा स्वरुपाचे वृत्त येत आहे.
महत्वाच्या बातम्या –
“माझे मंत्रिपद गेले तरी मला काही फरक पडत नाही” – गडकरींच्या भाषणाची चर्चा जोरात
“गुवाहाटी आणि सुरतला तुम्ही काय काय चाळे केले, हे भविष्यात…” अमोल मिटकरींचा पलटवार
“सावरकरांचा अपमान करणाऱ्या बाईला केतकी चितळेसारखी अटक होणार का?” – अभिनेते शरद पोंक्षे
सोनिया गांधी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणार?, अशोक गहलोत म्हणाले
“… नाहीतर मुंबईतील प्रत्येक रेल्वे स्टेशनला आग लागेल.”, जितेंद्र आव्हाडांनी दिला गंभीर इशारा