“मुलांच्या चांगल्या शिक्षणास ‘आप’ ला मतदान करा; मतदानादिनी दिल्लीच्या उपमुख्यमंत्र्यांचं ट्वीट”

नवी दिल्ली |  दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान पार पडत आहे. आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये कडवी टक्कर पाहायला मिळतीये. आज मतदान करण्यापूर्वी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांनी ट्वीट करत मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी ‘आप’ला मतदान करा, असं आवाहन दिल्लीकरांना केलं आहे.

मनीष सिसोदिया यांनी ट्वीट करत म्हटलंय, ‘लोकशाहीच्या महापर्वासाठी तमाम दिल्लीकरांना माझ्यावतीने आणि माझ्या पक्षाच्यावतीने शुभेच्छा. आपल्या खऱ्या मनाने मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी ‘आप’ला नक्की मतदान करा.’

आज सकाळी 8 वाजल्यापासून दिल्लीत मतदानाला सुरूवात झाली आहे. अनेक प्रमुख नेते मतदानासाठी सकाळी लवकरच हजेरी लावत आहेत. त्याअगोदर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कॅनोट प्लेसच्या हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. तर दिल्ली भाजपचे प्रमुख मनोज तिवारी यांनी छतरपूर मंदिर आणि कालकाजी मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले.

दरम्यान, 11 फेब्रुवारी रोजी दिल्ली विधानसभेची मतमोजणी पार पडणार आहे. दिल्लीचा महासंग्राम कोण जिंकतो याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या-

-काश्मिरची सुरक्षा महत्त्वाची… इंटरनेट हा मुलभूत अधिकार नाही- प्रसारण मंत्री

-मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी शेतकऱ्यांसाठी केलेली ‘ती’ घोषणा फसवी!

-रंगेल महाराज भागवत कथा सांगायला आला अन् गावातल्या बाईला नादी लावून तिला घेऊन पळाला!

-CAA, NRC मागे घेत नाही तोपर्यंत उठणार नाही; नागपाड्यातल्या आंदोलक महिलांचा एल्गार!

-कोपर्डी खटल्याच्या महत्वाच्या सुनावणीला वकील गैरहजर; संभाजीराजे संतापले