“चित्रा वाघ यांनी आपण कोणत्या मनोवृत्तीचे आहोत हे दाखवून दिलं”

मुंबई | महिला आयोगाचा अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका. तसेच चाकणकरांची निवड झाली तर प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल, अशी बोचरी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी रूपाली चाकणकरांवर केली. याला शिवसेना नेत्या मनिषा कायंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

एका महिलेला दुसऱ्या महिलेची प्रगती झालेली आवडली नाही. चित्रा वाघ कोणत्या मनोवृत्तीचे आहेत, हे त्यांनी दाखवून दिले आहे, असा घणाघात कायंदे यांनी केला आहे. त्या मुंबईत माध्यमांशी बोलत होते.

एका महिलेला दुसऱ्या महिलेची प्रगती झालेली आवडली नाही. चित्रा वाघ यांनी आपण कोणत्या मनोवृत्तीचे आहोत हे दाखवून दिलं आहे, असं म्हणत मनिषा कायंदे यांनी

खरंतर एक सहकारी म्हणून त्यांनी रुपाली चाकणकर यांना शुभेच्छा द्यायला हव्या होत्या. परंतु त्यांनी चाकणकर यांना शूर्पणखेची उपमा दिली. त्यांनी मत्सरी मानसिकतेचे दर्शन घडवून आणले आहे. चित्राताई वाघ यांना एखादं मानाचं पद मिळालं तर आम्ही त्यांचं अभिनंदन केलं असतं, असं कायंदे म्हणाल्या.

दरम्यान, चित्रा वाघ यांनी केलेल्या टीकेला रुपाली चाकणकर यांनी प्रत्युत्तर देण्याचं टाळलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

गांजा आणि तंबाखूमधील फरक एनसीबीला कळतो की नाही?- नवाब मलिक

तुम्ही कोणते टगे पोसत आहात ते पाहा- प्रीतम मुंडे

“आता नरेंद्र मोदींच्या नावाने मतं मिळतील याची काही शाश्वती नाही”

वर्मावर बोट ठेवत देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला, म्हणाले…

आमदाराने घोड्यावर चढून शिवरायांच्या पुतळ्याला हार घातला; शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट