“संध्याकाळी आम्ही जेव्हा पक्ष कार्यालयात जमलो तेव्हा….”; शिवसेना नेत्याने सांगितलं नेमकं काय झालं?

मुंबई | विधान परिषद निवडणूक (MLC Election Result) निकालानंतर राज्यातील राजकारणात मोठ्या घडामोडींना वेग आला आहे.  एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे 11 आमदारसोबत आहे.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे हे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल असल्याचं बोलेलं जात आहे. गुजरातचे गृहमंत्री असलेले सुरतचे भाजपचे आमदार हर्ष सांघवी हे या आमदारांसाठी सर्व नियोजन करत असल्याचं समोर आलं आहे.

विधान परिषदेच्या निकालानंतर एकनाथ शिंदे हे नॉट रिचेबल असल्याचं बोलेलं जात आहे. यावर शिवसेना नेत्या मनीषा कायंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संध्याकाळी आम्ही जेव्हा पक्ष कार्यालयात जमलो तेव्हा स्वतः एकनाथ शिंदे आमच्यासोबत उपस्थित होते. उद्धव ठाकरेंच्या शेजारीबसून ते सर्व आमदारांची विचारपूस करत होते, असं त्यांनी सांगितलं आहे.

या सगळ्या अफवा आहेत आणि असे काही नाही. एकनाथ शिंदे हे शिवसेनेतील प्रमुख नेते आहेत. त्यांच्यावर पक्षाची जबाबदारी असल्याने या सगळ्या अफवा आहेत. यामध्ये काहीही तथ्य नाही. एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहेत की नाही याच्याबद्दल पण मला शंका आहे, असं कायंदे म्हणालेत.

विरोधी पक्षातील लोकांना हे सर्व बोलण्याचं स्वातंत्र्य आहे. महाविकास आघाडीची एक जागा यायला हवी होती. पण ती का नाही आली यावर तिन्ही पक्षातील लोक विचार करतील, असं कायंदे म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! 11 आमदारांसह नॉट रिचेबल असलेले एकनाथ शिंदे अखेर गुजरातमध्ये सापडले 

“देवेंद्र फडणवीस पुढील दोन महिन्यांमध्ये पुन्हा मुख्यमंत्री होणार” 

मोठी बातमी! परमबीर सिंग यांचा सीबीआयला दिलेल्या जबाबात अत्यंत खळबळजनक दावा 

विधानपरिषदेच्या निकालानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले… 

मोठी बातमी! शिवसेना राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार विजयी, भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर