सोनिया गांधी, मनमोहन सिंग चिदंबरम यांना भेटायला तिहार तुरूंगात!

नवी दिल्ली | आयएनएक्स मीडिया प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय अर्थमंत्री पी.चिदंबरम गेल्या काही दिवसांपासून तुरुंगात आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग (यांनी सोमवारी सकाळी तिहार तुरुंगात चिंदबरम यांची भेट घेतली.

सीबीआय आणि ईडीकडून त्यांची चौकशी सुरु आहे. चिदंबरम यांच्या जामीनासंदर्भात अद्याप कोणताच निर्णय झालेला नाही किंवा इतक्यात त्यांना जामीन मिळण्याची शक्यता दिसत नाही. याच पार्श्वभूमीवर सोनिया गांधी आणि डॉ. मनमोहन सिंग यांनी चिंदबरम यांची भेट घेतली. याआधी मुलगा किर्ती याने चिदंबरम यांची भेट घेतली होती.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद आणि अहमद पटेल यांनी देखील चिदंबरम यांची भेट घेतली होती. त्यावेळी चिदंबरम यांचा मुलगा देखील उपस्थित होता.

गुलाम नबी आझाद आणि अहमद पटेल यांनी अर्धा तास चिदंबरम यांच्याशी चर्चा केली. देशातील राजकीय परिस्थिती आणि काश्मीर तसेच आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याचे कळतंय. आता आज सोनिया गांधी आणि मनमोहन सिंग यांनी चिदंबरम यांची भेट घेतली.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून चिदंबरम यांची प्रकृती ठीक नसल्याचं वृत्त आहे.

महत्वाच्या बातम्या-