मनमोहन सिंग यांची ‘एसपीजी’ सुरक्षा व्यवस्था काढली अन् दिली ‘ही’ सुरक्षा!

नव्वी दिल्ली : केंद्र सरकारने देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची ‘एसपीजी’ सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. मनमोहन यांना ‘झेड प्लस’ दर्जाची सुरक्षा मिळणार आहे. सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे वाद उभा राहण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एखाद्या व्यक्तीला असलेल्या धोक्याच्या आधारावर कोणतीही सुरक्षा दिली जाते.

मनमोहन यांच्या सुरक्षेतील कपात हा नियमीत प्रक्रियेचा भाग आहे. सुरक्षा यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे त्यात वेळोवेळी वाढ किंवा कपात करण्यात येते.

23 ऑगस्ट या दिवशी मनमोहन यांनी सहाव्यांदा राज्यसभा सदस्यत्वाची शपथ घेतली. काँग्रेसने त्यांना राजस्थानच्या कोट्यातून राज्यसभेवर पाठवलं आहे.

भाजपनं विरोधात उमेदवार न दिल्यानं मनमोहन सिंग यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाली आहे. यापूर्वी मनमोहन यांनी तब्बल 28 वर्षे राज्यसभेत आसामचे प्रतिनिधीत्व केले होते.

महत्वाच्या बातम्या-