मनोज जरांगे पाटलांना सर्वात मोठा झटका!; महिलेने जरांगेंवर केले गंभीर आरोप

Manoj Jarange | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी कसलीही परवा न करत जरांगे आंदोलन करत आहेत. मात्र, कालपासून जरांगेंवर गंभीर आरोप होत असल्याचं चित्र पहायला मिळत आहे. जरांगेंचा जिवलग मित्र आणि किर्तनकार अजय बरासकार यांनी जरांगेवर आरोप केले आहेत. हे सुुरु असतानाच आता जरांगेंवर महिलेने देखील काही आरोप केले आहेत. जरांगेंना कोणता नेता या सगळ्या गोष्टी सांगतो याबाबत या महिलेने खुलासा केलाय.

काय आहे प्रकरण?

जरांगे (Manoj Jarange) पाटील यांच्या अत्यंत जवळचा आणि विश्वासू माणूस म्हणून ओळखला जाणारा त्यांचा मित्र, आणि किर्तनकार अजय बरासकारने जरांगेंवर आरोप करत त्यांच्या गुप्त बैठकांबाबात खुलासा केला. मात्र, त्याच्या काही तासांनीच जरांगेंच्या जवळच्या सहकारी संगिता वानखडेंनी जरांगेंवर आरोप करत खुलासे केले. यामुळे एकीकडे मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलन तीव्र करण्याची घोषणा करत असताना त्यांना आरोपांना समोरे जावे लागत आहे.

काय म्हणाल्या वानखेडे?

जरांगे (Manoj Jarange) यांच्या सहकारी माध्यमांशी बोलत असताना म्हणाल्या की, ”मनोज जरांगे भोळा भाबडा माणूस, मूळ भाषा शैलीत बोलणारा माणूस म्हणून मी आधी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. मनोज जरांगे यांची बाजू घेऊन मी छगन भुजबळ यांना ट्रोल केलं होतं. मात्र, मला खरं समजल्यावर गेल्या 1 ते 1/5 महिन्यांपासून मी विरोध करत आहेत.”

पुढे त्या म्हणाल्या की, “मनोज जरांगे कोणाला विश्वासात घेत नव्हते. त्यांना शरद पवार यांचाही फोन येत होता. शरद पवार जसे सांगतात तसेच मनोज जरांगे करतात. पुणे शहरात मनोज जरांगे यांचे बॅनर ज्यांनी लावले ते राष्ट्रवादी काँग्रेस चे पदाधिकारी यांनी लावले होते. महाराष्ट्राला त्यांनी वेड बनवलं आहे.”

“सरकारकडून ट्रॅप करण्याचा प्रयत्न”

मनोज जरांगे यांनी अजय महाराज यांचे आरोप फेटाळले आहे. सरकारकडून आपल्याला ट्रॅप करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी अजय महाराज यांनी पैसे घेतल्याचा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला. सरकारला हा ट्रॅप महागात पडणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलंय.

News Title : Manoj Jarange gets big shock

महत्त्वाच्या बातम्या-

‘बरासकरची सगळी हिस्ट्री माझ्याकडे आलीये…’; मनोज जरांगेंचा मोठा गौप्यस्फोट!

WhatsApp ने लाँच केले धमाल फीचर्स; चॅटिंग करताना येणार मज्जाच मज्जा

रकुलप्रीत सिंह आणि जॅकी भगनानी अडकले लग्नबंधनात; अभिनेत्रीचा लेहेंगा होतोय प्रचंड व्हायरल

राजकारणातील सर्वात खळबळजनक बातमी! माजी राज्यपालांच्या घरावर सीबीआयचे छापे

दिलासादायक! केंद्र सरकारने 5 कोटी शेतकऱ्यांना दिली मोठी भेट